Akola Accident News Saam tv
महाराष्ट्र

Akola Accident News: छोटा हत्ती, कारची समोरासमोर धडक; १० प्रवासी जखमी, तेल्हारा ते मनात्री रोडवर अपघात

छोटा हत्ती, कारची समोरासमोर धडक; १० प्रवासी जखमी, तेल्हारा ते मनात्री रोडवर अपघात

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 

अकोला : अकोला जिल्ह्यतील तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथून जवळच असलेल्या आडसूळ फाट्याजवळ छोटा हत्ती गाडी व कारची समोरासमोर (Accident) धडक होऊन अपघात झाला. यात छोटा हत्ती (Akola) या गाडीत बसलेले १० प्रवाशी जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथून जवळच असलेल्या आडसूळ फाट्याजवळ येथे टाटा मॅजीक व इडिंका कारची समोरासमोर धडक झाली. मनात्री खुर्द येथून जवळच असलेल्या आडसूळ फाट्याजवळ टाटा मॅजीक आडसूळ फाट्यावरून तेल्हाराच्या दिशेने जात असताना मनात्री खुर्द फाट्यावरुन भरधाव वेगाने येत असलेली कारने टाटा मॅजीकला कट मारला. या अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. 

टाटा मॅजीकमध्ये बसलेले प्रवासी दहा असून ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात प्रवाशी जखमी अवस्थेत असल्यावर अपघातानंतर १ ते २ तास अ‍ॅम्ब्युलन्स आलीच नाही. तसेच तेल्हारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी येत असताना पोलीस वाहन मध्यंतरी बंद पडले. यामुळे पोलीस प्रशासन देखील उशीराने पोहचले. पुढील तपास सहाय्यक पोलीस अमोल सोळंके करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT