Akola Accident Saam tv
महाराष्ट्र

Akola Accident : अकोल्यात डिझेल टँकर पलटी; डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी

Akola News : अकोला अमरावती महामार्गावर डिझेलने भरलेला टँकर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास पलटी झाला.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: अकोल्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डिझलचा टँकर पलटी झाला. यामुळे टँकरमधून डिझेलची गळती होत असून गावात डिझेलचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे महामार्गालगत असलेल्या गावकऱ्यांनी टँकरकडे येत डिझेलच्या कॅन भरून नेण्यासाठी गर्दी करत आहेत. 

अकोला (Akola) अमरावती महामार्गावर डिझेलने भरलेला टँकर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास पलटी झाला. महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी झाल्याची माहिती काही क्षणातच गावभर पसरली. (Accident) यानंतर गावकऱ्यांनी जमेल ते भांडे हातात घेऊन टँकरकडे धाव घेतली. पाण्याचा टँकर आल्यानंतर जी लगबग राहते. तशीच लगबग डिझेल जमा करण्यासाठी सुरु होती. बोरगांव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.

बकेट, कॅन घेऊन नागरिक धावले 

टँकरमधून डिझेल (Diesel) गळती होत असल्याने ते भरण्यासाठी कोणी प्लास्टिकची बकेट घेतली, तर कोणी ५ ते १० लिटरच्या कॅन हातात घेत टँकरकडे धाव घेतली. जमेल तेवढे डिझेल गोळा करायची धावपळ सुरु झाली. हा संपूर्ण प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा गावालगतचा घडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT