Bus Accident Akkalkot Saam Tv News
महाराष्ट्र

Solapur News: चालक दारूच्या नशेत, एसटी बसचा भीषण अपघात, ७-८ जणांची प्रकृती गंभीर

Bus accident on Akkalkot highway: एसटी चालकाच्या बेशिस्तपणामुळे एक भीषण अपघात घडला आहे. हा भीषण अपघात अक्कलकोट महामार्गावर कुंभारीजवळ घडला आहे. ७-८ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

सोलापूर - अक्कलकोट महामार्गावर कुंभारीजवळ एसटी चालकाच्या बेशिस्तपणामुळे एक भीषण अपघात घडला आहे. एका एसटीने टोल नाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना पाठीमागून धडक दिली आहे. पाठीमागून एसटीनं धडक दिल्यामुळे ७- ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

एसटी चालक त्यादरम्यान मद्यधुंद अवस्थेत होता. अशी माहिती प्रवांशाकडून देण्यात आली आहे. सुदैवाने यात जिवितहानी झालेली नाही. मात्र, काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

अक्कलकोट महामार्गावर कुंभारीजवळ एक भीषण अपघात घडला आहे. एका एसटीने पाठीमागून काही वाहनांना जबर धडक दिली आहे. एसटीने टोल नाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना जोरात धडक दिल्यामुळे समोरचे तीन ते चार वाहनं एकमेकांवर आदळली आहेत.

या अपघातात ७ ते ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात घडल्यानंतर तातडीने जखमींना सोलापूर शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एसटी चालक एसटी चालवताना मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती काही प्रवाशांनी दिली आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झालेली नाही.

ट्रकचा भीषण अपघात, ५-६ वाहनं एकमेकांवर आदळली

सोलापूरहून बीडच्या दिशाने जाणाऱ्या एका ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकमधील हरभऱ्याची पोते रस्त्यावर पडले आहेत. अचानक समोरील वाहनाने ब्रेक दाबल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, पाच जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर जवळपास पाच ते सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT