akash gaikwad saam tv
महाराष्ट्र

Solapur News : शाळा शिक... माेठा हाे... आई - वडील रागावले, नववीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

या घटनेची माहिती आई-वडीलांनी पाेलीसांना दिली.

विश्वभूषण लिमये

Solapur News : किरकाेळ कारणावरुन आज पुन्हा एका अल्पवयीन मुलाने त्याचे जीवन संपविल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात समाेर आली आहे. गेल्या दाेन दिवसांत अल्पवयीन मुलांनी जीवन संपविल्याची ही तिसरी घटना साेलापूर जिल्ह्यातून समाेर आली आहे. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आई-वडील अभ्यास कर, शाळा चांगली शिक म्हणून सांगितल्याच्या कारणावरून मनात राग धरून नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरात आत्महत्या केली. आकाश अनिल गायकवाड (वय १५) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आकाश अनिल गायकवाड हा नववीच्या वर्गात शिकत होता. आकाशला शाळा व्यवस्थित शिक, शाळा व्यवस्थित शिकला नाहीस तर जनावरे राखावी लागतील असे बोलून आई-वडील बार्शीला गेले होते.

आई-वडील बोलल्याचा राग मनात धरून आकाशने राहत्या घरात आत्महत्या केली. आई-वडील बार्शीहून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तत्काळ पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. याबाबत पांगरी पोलीस स्टेशनमध्ये मयत आकाश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT