ajit pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : खंडणी मागितल्यास मकोका लावणार, खंडणीकर्त्यांना अजित पवारांचा दम

Ajit Pawar News : सरकारी कामात खंडणी मागितली तर मकोका लावणार असा सज्जड दमच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय.दादांनी हा दम कुठं भरला? कोणत्या मंत्र्याच्या कार्यकर्त्याना इशारा दिला ? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्याचे अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये खंडणीचे प्रकार सुरु असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य करत धनंजय मुंडेंसमोरच खंडणीकर्त्यांना सज्जड दम दिलाय. एवढंच नाही तर चुकीची कामं करणाऱ्याला मकोका लावण्याचाही इशारा दिलाय. दादांनी धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातच जाहीररपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढल्यामुळे आता अंजली दमानियांना धनंजय मुडेंवर निशाणा साधण्याचं आयतं कोलीत मिळालं. दमानियांनी थेट धनंजय मुंडेंवर मकोका लावण्याची मागणी केलीय.

सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या आरोपात वाल्मिक कराडवर मकोकांतर्गत कारवाई केलीय. आता सत्ताधारी आणि विरोधकांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंकडे वळवलाय. त्यामुळे धास्तावलेल्या कार्यकर्त्यांनी आता सांभाळून घेण्यासाठी फिल्डिंग लावल्य़ाचं दिसतंय. त्यांनाही दादांनी चांगलंच सुनावलंय.

बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाल्यानंतर मुंडेंनी त्यांचं जंगी स्वागत केलं नाही. एवढंच नाही अजित पवारांसमोर धनंजय मुंडे हे मान खाली घालून उभे असल्याचं चाणाक्ष जाणकारांच्या नजरेतून सुटलं नाही. अजित पवारांनी बीडमध्ये दाखल होताच कार्यकर्ते, नेते आणि प्रशासनाला सज्जड इशारा दिलाय.. त्यामुळे अजित पवारांचा हा अवतार पहिलं इम्प्रेशन पाडण्यासाठी होता की गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी? हे पुढील काळात कळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT