Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: फडणवीसांनंतर दादाही बनले 'कलाकार'? वेशांतर करून सत्तासहभागापूर्वी शहांसोबत बैठका? अजित पवारांनी सांगितला संपूर्ण किस्सा

Maharashtra Politics: शिवसेनेतील फुटीवेळी देवेंद्र फडणवीस वेशांतर करुन भेटायचे, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला होता. तर आता महायुतीचा हिस्सा बनताना अमित शाहांसोबत झालेल्या गुप्त बैठकांच्या वेळचा वेशांतराचा किस्साच अजित पवारांनी सांगितलाय.

साम टिव्ही ब्युरो

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या फूटीने दुसरा राजकीय भूकंप घडला आणि राज्याचं राजकीय समीकरण बदलून गेलं. मात्र अजित पवार यांची महायुतीला साथ हे एका रात्रीत घडून आलेलं समीकरण नक्कीच नव्हतं. आता अजित पवार यांनीच या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलाय.

आपण वेशांतर करून अमित शाहांसोबतच्या गुप्त बैठकांना उपस्थित राहायचो, अशी कबुलीच अजित पवार यांनी दिलीय. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलाय. विशेष म्हणजे तर अजित पवार यांच्या दाव्याला खुद्द अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीच दुजोरा दिलाय.

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी वेशांतर करून बैठका घेतल्याचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात स्पष्ट केलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वर्षभरापूर्वी वेशांतर करून राष्ट्रवादीच्या फूटीची स्क्रिप्ट लिहीली गेल्याचं अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलंय.

वेषांतर करून दादांचं 'मिशन सरकार'?

महायुतीत सहभागापूर्वी खास पेहराव करून अजित पवार दिल्लीवारी करायचे. विमानाचं तिकीट काढताना ए ए पवार या शॉर्टफॉर्मनं तिकीट बूक केलं जायचं. ओळख लपावी म्हणून मास्क आणि टोपी घालून ते प्रवास प्रवास करायचे. सत्तेतील सहभागापूर्वी अमित शाहांसोबत 10 गुप्त बैठका झाल्या आणि याच बैठकांमध्ये रचला सत्ता सहभागाचा पट लिहिला गेला.

अजित पवार, फडणवीस आणि शिंदेंच्या हुबेहूब वेषांतरामुळे मराठी कलाक्षेत्र राजकीय कलाकारांना मुकल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. संजय राऊत म्हणाले की, ''खोट्या मिशा लावून हे दिल्लीत अमित शहा यांना भेटायला जात होते. या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टी आपलं चित्रपटांचं फार मोठं नुकसान केलं आहे.''

इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज ते अकबरापर्यंत अनेकांनी वेषांतर करून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र राज्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी वेषांतर करून सत्तेचं समीकरण जुळवलं. मात्र अशीच तत्परता दाखवून आणि क्लुप्त्या रचून त्यांनी जनतेच्या समस्या मार्गी लावाव्या, हीच अपेक्षा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT