संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी वाल्मिक कराडशी संबंध असल्याने धनजंय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता मुंडेंना मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली जातेय. इतकेच नाहीतर धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळावं, यासाठी महंत नामदेवशास्त्री यांनी देवाला साकडं घातलं होतं.
आज मुंडेंच्या मंत्रिपदासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. त्यामुळे नामदेवशास्त्रींच्या प्रार्थनेला फळ आलं, असं म्हटलं जातंय. मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असं भाष्य अजित पवार यांनी केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते.
यावेळी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात यावे अशी मागणी केली जात होती, त्यावेळी अजित पवार यांनी तिन्ही नेते त्यावर विचार करतील त्यानंतर मुंडेंच्या मंत्रिपदाचा निर्णय लागेल असं म्हटलं. कोणी काय म्हणावं, उद्या येथे तुम्हाला मंत्री करा असं म्हणतील. पण मधल्या काळात जी घटना घडली, त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे.
पोलीस तपास सुरू आहे. एसआयटी नेमलेली आहे. या सगळ्याचा चौकशीचा अहवाल आला त्यानंतर त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मराठी आपली मातृभाषा आहे. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते, त्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. आपली मातृभाषा टिकली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच धाडस कोणी दाखवलं नाही. ते एनडीए आणि पंतप्रधान मोदींनी केलं. जगात सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलली जाते. तुमच्या आमच्या कोणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल, तर मराठी भाषा बोलता आली, पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेची काळजी वाहत आहेत. देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. वाल्मिक कराड आणि मुंडेंचे संबंध जगजाहीर असतानाही नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची उघडपणे पाठराखण केली. आता नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी थेट देवाकडे प्रार्थना केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.