Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: लाडक्या बहि‍णींना पैसे देणार अन् भाऊ, नवऱ्यांना दारूडे करणार...; अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊत संतापले

Sanjay Raut: तब्बल १२ लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात आलाय. मात्र या योजनेवर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी घरात दारू पोहोचवा असं एक नवं व्हिजन सरकारचं आहे, असं राऊतांनी म्हटलंय.

Surabhi Jayashree Jagdish

निवडणूकीपूर्वी सरकारने लाडकी बहिण योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ घेतला आहे. दरम्यान ज्या महिलांना आधारकार्ड सिडिंग प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते त्या लाडक्या बहिणींना देखील आता पैसे मिळणार असल्याची माहिती आहे. तब्बल १२ लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात आलाय. मात्र या योजनेवर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी घरात दारू पोहोचवा असं एक नवं व्हिजन सरकारचं आहे. म्हणजे बहिणींना योजनेचा हफ्ता द्यायचाआणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे, दारूडे निर्माण करायचे. अशी पैसे कमावण्याची योजना दिसते आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लाडकी बहीण योजना त्याचप्रमाणे 2 लाख कोटीची तूट भरुन काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं असल्याचं विधान केलं होतं.

ही अत्यंत गंभीर बाब असून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारी आहे. अजित पवारांसारखा नेता महसूल वाढवण्यासाठी याबाबत विचार करत असेल तर ते राज्याचे दुर्दैव म्हणावं लागेल. अजित पवार खरोखर असा विचार करत असतील तर त्यांनी यशवंतराव चव्हाण… हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात, आणि त्यांच्या होर्डिंग्जवर शाहू-फुले-आंबेडकरांचे फोटो लावतात ते बंद केलं पाहिजे, असंही टीकास्त्र संजय राऊत यांनी केलं आहे.

लाडकी बहीण योजना बंदही केली जाऊ शकते

फडणवीस सरकारकडून लाडकी बहीण योजना बंदही केली जाऊ शकते, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. राऊत यांच्या म्हणण्यांनुसार, भविष्यात लाडकी बहीण योजना बंदही केली जाऊ शकते. लाखो हजारो कोटींचं ओझं घेऊन राज्य चालवणं सोपं नाहीये.

निवडणुकींच्या आधी कोणतेही निकष न लावता मतांसाठी पैसे वाटले गेले. मात्र आता निवडणुका जिंकल्यानंतर सरकार निकष लावतंय. लाडक्या बहीणींना पंधराशे रुपये देण्यासाठी दारू दुकानाचे परवाने वाढवणं हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. यावेळी महिलांनी म्हणजेच बहि‍णींनी आपल्या घरात १५०० रुपयात आपण कोणतं विष आणतोय याचं चिंतन केले पाहिजे. सरकार चांगल्या मनाने पैसे देत नाही, असंही राऊत यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT