Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: कूठं फेडाल ही पापं! तुम्हांला तर नरकातच जावं लागेल : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.

ओंकार कदम

काेयनानगर : चेंबरी येथील शासकीय विश्रामगृहाचे नव्याने करण्यात आलेले कामकाज आपल्याला आवडले नाही. या कामाची चौकशी (enquiry) लावणार असल्याचे खूद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज (साेमवार) येथे (koynanagar) कार्यक्रमात जाहीर केले. दरम्यान चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांना नरकातच जावं लागेल असेही पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (ajit pawar latest marathi news)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयना धरणालगत नव्याने बांधण्यात आलेल्या चेंबरी शासकीय विश्रामगृहाचे उदघाटन केले. त्यानंतर कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटपाच्या कार्यक्रमात बांधकाम विभागातील अधिका-यांच्या कामाचा पाणउतारा केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले चेंबरी शासकीय विश्रामगृहाचे काम चांगले झालेले नाही. याची मी चौकशी लावत आहे. कर्मचारी आणि अधिकारी यांना पगार व सेवानिवृत्ती दिली जाते. परंतु तुम्ही काम चांगले करीत नाही. चुकीच्या पद्धतीने काम करणा-यांना नरकातच जावं लागेल. जाे चांगले काम करताे त्यांच्या पाठीशी मी राहताे सर्वांना माहिती आहे असेही पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT