ajit pawar  Saam Tv
महाराष्ट्र

अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, राष्ट्रवादीच्या खासदाराने व्यक्त केली इच्छा

Mahayuti internal conflict in local elections : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. रायगडमधील महायुतीत फूट, राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार.

Namdeo Kumbhar

  • सुनील तटकरे यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली.

  • सुनील तटकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले.

  • रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद समोर आला आहे.

  • स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला फायदा होण्याची शक्यता.

NCP Leader Calls for Ajit Pawar to Be Next CM : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. महाराष्ट्रातील जनतेची देखील तीच इच्छा आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे. ते माणगाव येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. सुनील तटकरे यांनी यावेळी रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नसेल, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळवर लढणार असल्याचे संकेतही यावेळी दिले आहेत.

सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी मनातील इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर रायगड आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. माणगाव येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे बोलताना म्हणाले की, "अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. महाराष्ट्रातील जनतेची देखील तीच इच्छा आहे. राज्यात उपमुख्यमंत्रिपद १९७८ साली पहिल्यांदा निर्माण झालं, पण सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री व्हायचा आणि राज्याचा अर्थ संकल्प मांडण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे."

रायगडमध्ये महायुती नाही, तटकरंचे संकेत

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात महायुती नाही, असे म्हणत सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना तटकरेंनी कार्यकर्त्यांना शब्द दिला. ते म्हणाले की, निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही.

तटकरे-गोगावले संघर्ष -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह समोर येऊ लागलाय. रायगडमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील सुप्त संघर्ष आता पुढे येतोय. भरत गोगावाले अन् तटकरे यांच्यामधील वाद आता चव्हाट्यावर आला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर लढल्या जाणार आहे, याचा फायदा शिवसेना ठाकरेंना होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

SCROLL FOR NEXT