Rohit Pawar addressing a press conference over serious allegations in Ajit Pawar plane crash case. Saam Tv
महाराष्ट्र

अजित पवारांचा विमान अपघात नव्हे , 100 टक्के घातपात; रोहित पवारांचा आरोप

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत विमान कंपनीवर प्रश्नांची सरबत्ती केली. आणि हा अपघात नाही तर 100 टक्के घातपात असल्याचा आरोप केलाय.

Bharat Mohalkar

  • अजित पवारांचा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचा रोहित पवारांचा आरोप

  • विमान कंपनीच्या पार्श्वभूमीवर गंभीर प्रश्न उपस्थित

  • युरोपमध्ये बंदी असतानाही व्हीआयपी सेवेसाठी परवानगी कशी?

खरंतर याआधी अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी संशय उपस्थित केला.. 2023 मध्ये मुंबई विमानतळावर झालेल्या अपघातानंतर युरोपमध्ये या कंपनीवर बंदी घातली.. मात्र त्यानंतरही व्हीआयपींच्या सेवेसाठी या कंपनीला परवानगी का देण्यात आली? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

एवढंच नाही तर उड्डाणाआधीच्या विमान तपासणीवरही रोहित पवारांनी संशय व्यक्त केलाय. हा अपघात नाही तर घातपात असल्याबाबत संशय बळावला तो पायलटच्या वर्तवणुकीची माहिती समोर आल्यानं... रोहित पवारांनी त्यावरही बोट ठेवलंय. एवढंच नाही तर रोहित पवारांनी विमान लँड करताना व्हिजिबिलिटीचा प्रश्न होता तर गो राऊंड का घेतला नाही? असा सवाल केलाय.

दुसरीकडे अजितदादांच्या अपघातानंतर अनेकांनी दादांनीच वेळ कमी असल्यानं रिस्क घ्यायला लावली असेल, असा दावा केला होता.. मात्र हा दावाही रोहित पवारांनी खोडून काढलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tueday Horoscope: आज तुमचे जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद होतील, वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

SCROLL FOR NEXT