NCP News Saam TV
महाराष्ट्र

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर

Ajit Pawar On Action Mode: पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.

Ruchika Jadhav

NCP Party and Symbol:

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय जाहीर केला. पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचेच असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. काल जाहीर झालेल्या निकालावर अजित पवार गटातील सर्वच नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. अशात आता पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर लगेचच अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांनी नेते पदाधिकार्यांना सूचना दिल्यात अशी माहिती सूत्रांनी दिलीये. देवगिरीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष-चिन्ह मिळालंय. त्याचा सर्वांनी मान राखा. जाहीरपणे बोलताना वाद होईल, अशी वक्तव्ये टाळा. पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पत्र देणार आहे. अजित पवार यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी पत्रात करण्यात येणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. आज दुपारी लोकसभेत ओम बिर्ला यांना सुनील तटकरे यांच्या वतीने हे पत्र देण्यात येईल अशी शक्यता आहे. पत्रात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा उल्लेखही करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT