rupali thombare patil Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

rupali thombare patil on nishikant dubey : अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा समाचार घेतला. चपलेचा प्रसाद देईल, अशा शब्दात त्यांनी दुबेंवर टीका केली.

Akshay Badve

पुणे : देशात भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मिरा-भाईंदरमधील एका व्यापाऱ्याला भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या मारहाणीचे उत्तर भारतात पडसाद उमटत आहेत. याच वादावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही चिथावणीखोर वक्तव्य केलं. महाराष्ट्रातून बाहेर या, आपटून मारू, असं वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'दुबे यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा महाराष्ट्रात भाजप खासदाराला चपलेचा प्रसाद देईल, अशा शब्दात अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात भाषेवरून वाद पेटला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही हिंदी भाषिकांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'आम्ही मराठी भाषिकांना आपटून मारू, असा इशाराच दुबे यांनी दिला. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याने वाद आणखीच पेटला आहे. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा समाचार अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतला आहे. ठोंबरे पाटील यांनी दुबे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, 'दुबे जरी आमच्या मित्रपक्षाचे भाजप खासदार असले तरी सुद्धा त्यांनी मराठीबद्दल बोलू नये. तुम्ही तुमची भाषा झारखंडमध्ये वापरायची, महाराष्ट्रात वापरायची नाही. मराठी माणूस बाहेर का पडेल? मराठी माणूस तुमच्या राज्यात जेव्हा काम करतो, तेव्हा त्याची ती कर्मभूमी असते. अमराठी लोकांनी नक्की यावं, मराठी शिकावी आणि सम्मान करावा. भाजपला विनंती आहे की, बेताल बोलणाऱ्या लोकांवर कारवाई करावी'.

'भाजपने या खासदारांना आवरा. जमत नसेल तर बिस्तारा उचला आणि निघा. तू काय आपटून मारशील? तुला आम्ही आपटून मारू. आपण झारखंडचे आहोत म्हणून बोलू असं त्याला वाटलं असेल. दुबे सारख्या लोकांना मारायची गरज आहे. येथे येणारे काम करणार आणि तंगड्या वर करणार. तुझ्या इथे येऊन तुला मराठी माणूस आपटू शकतो. दुबे कुत्र्यासारखा असेल, गुरफटून बोलत असेल, असे ठोंबरे पाटील पुढे म्हणाल्या.

'बाहेरच्या लोकांनी मराठी भाषेची अस्मिता भाषा जपलीच पाहिजे. दुबे यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. महाराष्ट्रात आले तर चपलेचा प्रसाद नक्की देईल, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT