MAHAYUTI TENSIONS saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीची महायुतीत कोंडी? आमदारांना मिळेना निधी, पराभवाची भीती? सुनेत्रा पवारांसमोर आमदारांची कैफियत

Ajit Pawar Ncp Mlas Unhappy Over Fund Allocation In Mahayuti: महायुतीत भाजप आणि शिंदेसेनेत धुसफूस असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी तक्रार केली आहे. महायुतीत कोंडी होत असल्याची नाराजी व्यक्त केलीय...सुनेत्रा पवारांसमोर पक्षाच्या बैठकीत आमदारांनी कैफियत मांडताना नेमकं काय सांगितलं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Suprim Maskar

महायुतीत पुन्हा एकदा निधीवरून वाद उफाळून आलाय. याला कारण ठरलंय

राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी सुनेत्रा पवारांसमोर मांडलेली कैफियत...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक

घेण्यात आली. या वैठकीत सुनेत्रा पवारांनी राजकारणावर न बोलण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर मग काय...आमदारांनी तक्रारींचा पाढाच वाचायला सुरूवात केली. काहींनी

आपल्या मतदारसंघांतल्या कामांना निधी मिळत नसल्याची कैफियत मांडली. तर काहींनी

निधी न मिळाल्यास जेवढ्या मतांनी निवडून आलो तेवढ्या मतांनी पराभव होणार असल्याची

भीती व्यक्त केली. आमदारांनी सुनेत्रा पवारांपुढे काय गाऱ्हाण मांडलयं...पाहूयात..

बैठकीतल्या या इनसाईड स्टोरीतून...

राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार काय म्हणाले?

राष्ट्रवादी पक्ष कमजोर होत असल्याची भावना

वरिष्ठ नेत्यांमध्ये जे काय चालतंय ते आम्हाला खाली काहीच कळत नाही

अनिल पाटलांकडून अर्थ खातं पुन्हा मिळवण्याची मागणी

महायुतीतील घटक मित्रपक्षांकडून सहकार्य मिळत नाही

शिंदेंकडे असलेल्या खात्यांमध्ये तसंच त्यांच्या मंत्र्यांकडून कामं होत नाहीत

सत्तेतील आमदारांची कामे होत नसल्यास, संघटनात्मक ताकदीवर परिणाम

कामे मार्गी लागत नसल्यानं मतदारसंघात उत्तर देणं कठीण

निधीअभावी जेवढ्या मतानं निवडून आलो, तितक्याच मतानं पडण्याची आमदारांना भीती

भाजपची दादागिरी वाढल्याची साताऱ्यातील मंत्र्यांची तक्रार, सातारा जि.प.मध्ये

त्रास दिल्याचा आरोप

कुंभमेळा आणि विकासकामांत राष्ट्रवादीला डावलल्याची नाशिकमधील महिला आमदाराची

तक्रार

दरम्यान निधीसाठी आमदारांनी व्यक्त केलेली नाराजी खरी असल्याचं आणि

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही असल्याबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचं

विधान सुनील तटकरेंनी केलयं...मात्र संबंधित मंत्र्यांना निधी दिल्याचा दावा महसूल

मंत्री बावनकुळेंनी केलाय.

दरम्यान मित्रपक्षांच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला

जात नसल्यानं दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना लवकरच कोसळणार असल्याचा दावा संजय

राऊतांनी केलाय... आता राष्ट्रवादीतल्या आमदारांनी मित्रपक्षांवर नाराजी व्यक्त केल्यानं

सुनेत्रा पवार महायुतीतील घटक पक्षांच्या मंत्र्यांवर दबाव आणणार का? भाजप-

शिंदेसेनेतील वाद विकोपाला जात असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त

केल्यानं महायुती वादाचा भडका उडणार की मुख्यमंत्री मध्यस्थी करून तोडगा काढणार

याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेत फूट पडणार? शिंदेसेनेतील आणखी दोन शिंदे कोण?

बदलीनंतर FDA चं काय होणार? मिशन थांबणार? स्वतः तुकाराम मुंढेंनीच दिलं उत्तर|VIDEO

Diwali Faral Recipe: यंदा दिवाळीत नक्की बनवा 6 पारंपरिक फराळाचे पदार्थ; सणाची मजा येईल दुप्पट!

Sharad Pawar: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

समुद्रात छटपूजा नकोच! मनसे आक्रमक, मुंबईत नवा वाद पेटणार?

SCROLL FOR NEXT