ajit pawar & narayan rane 
महाराष्ट्र

राणेंचा नामाेल्लेख टाळत पवारांनी काढला चिमटा; काैतुकही केलं

त्यांचे काैतुक करताे पण तुम्ही गाफील राहू नका असा सल्ला उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : निर्धारनं मतदान करा. काेणाच्या ही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडू नका. इंथ काही काही घटना घडल्या आहेत याचा इतिहास तुमच्या समाेर आहे. जसं एकेक दिवस मतदानाचा जवळ जवळ येईल तसं उमेदवारांनी गाफील राहू नये. आम्ही सगळे बराेबर असलाे तरी मतदारांशी संपर्कात रहा असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी उमेदवारांसह मतदारांना दिला.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे सिंधूदूर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (dcc bank) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मतदारांशी संवाद साधला. नारायण राणे यांनी आपल्या हॉस्पिटलला जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलं होते. ते वेळेवर फेडू शकले नाही. हा धागा पकडत उपमुख्यमंत्र्यांनी राणेंवर त्यांचे नाव घेता टीका केली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले तुमच्या जिल्ह्यातील काही महाभागांनी (narayan rane) (राणेंचा नामाेल्लेख टाळत) जिल्हा बँकेचे कर्ज कसं घेतले आणि कसं थकवलय हेही आपण पहा. त्याच्यामध्ये एनपीए किती आहे ते पडताळा. त्यांनी लाभांश चांगला दिला. खरंतर मी देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत १५ टक्का लाभांश देऊ शकत नाही. त्यांचे काैतुक करताे पण तुम्ही गाफील राहू नका असा सल्ला उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mira Bhayander: मिरा भाईंदर शहराचं नाव कसं पडलं? या दोन गावांचा आहे इतिहास

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो जास्त Stomach Cancer चा धोका

बाळाला घरातच ठेवून आई मुलीला शाळेत सोडायला गेली, चिमुकली चालत खिडकीत आली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Vande Bharat Train: गुड न्यूज! या मार्गावर धावणार १६ कोचची वंदे भारत ट्रेन, कसा असेल मार्ग?

Sarpanch: 'बाबा, तुम्हीच आमचे विठ्ठल' वारीहून वडील परतले, सरपंच मॅडमच्या कृतीने वेधलं लक्ष; नेटकरी भावूक

SCROLL FOR NEXT