Ajit Pawar Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Latest News: अजित पवारांच्या भेटीला आले नेते-आमदार कोण-कोण? लेटेस्ट यादी आली समोर

Ajit Pawar Meets Ncp Mla : अजित पवारांच्या भेटीला आले नेते-आमदार कोण-कोण? लेटेस्ट यादी आली समोर

Rashmi Puranik

Ajit Pawar Meets Ncp Mla : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये सामील होणार, अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता राष्ट्रवादी पक्षातही अस्वस्थता वाढली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने नुकतंच वृत्त दिलं होतं की, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत. मात्र त्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

अशातच कालपासूनच अजित पवार यांचा सरकारी बंगला आलेल्या देवगिरी येथे राष्ट्रवादीच्या अनेक बेड्या नेत्यांनी आणि आमदारांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यांना भेटलेल्या नेते आणि आमदारांची आता यादीही समोर आली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Meets Ncp Mla : मंगळवारी 'या' आमदारांनी घेतली अजित पवारांची भेट

अजित पवार (Ajit Pawar Latest News) यांची भेट घेण्यासाठी कालपासूनच राष्ट्रवादी आमदारांनी त्यांच्या बंगल्यावर रांग लावली आहे. मंगळवारी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची आमदार शेखर निकम, धर्मराव बाब अत्राम, धनंजय मुंडे, नितीन पवार, अनिल पाटील, अण्णा बनसोडे, संजय मामा शिंदे, देवेंद्र भुयार आणि मनोहर चंद्रिकापुरे यांनी घेतली भेट. (Maharashtra Latest News)

Ajit Pawar Meets Ncp Mla : आज यशवंत माने यांच्यासह या आमदारांनी घेतली भेट

आज अजित पवार (Ajit Pawar Latest News) यांची अमर यशवंत माने, राजू नवघरे, दत्तामामा भरणे आणि नितीन पवार यांनी भेट घेतली आहे. यातच आज सकाळी देवगिरीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार मोठ्या प्रमाणात अजित पवार (Ajit Pawar Latest News) यांची भेट घेत असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT