Ajit Pawar and Jay Pawar seen during a political event amid speculation of Jay’s entry into electoral politics. saam tv
महाराष्ट्र

अजितदादांची जय पवारांसाठी 'पॉवरफुल' खेळी?जय पवार होणार बारामतीचे कारभारी?

Baramati Municipal Election: अजित पवार जय पवारांसाठी मोठी पॉवरफुल खेळी खेळण्याची शक्य़ता आहे. असं आम्ही का म्हणतोय? जय पवार कोणत्या निवडणुकीतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणार आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • नगराध्यक्षपदासाठी मोठा संघर्ष होण्याची शक्यता

  • अजितदादा धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता

  • अजितदादांच्या दुसर्‍या चिरंजीवांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं ती निवडणुक प्रचंड गाजली. अशातच माळेगावनंतर अजितदादांनी बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी पुन्हा तोच पॅटर्न वापरण्याची तयारी सुरु केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. त्यामुळे बारामती विधानसभेतील यशानंतर तब्बल 9 वर्षांनी होणारी बारामती नगरपालिकेची निवडणूकही अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. दादांनी नेमकी काय रणनिती आखलीय पाहूयात.

जय पवारांसाठी दादांची पॉवरफुल खेळी?

बारामतीतून नगरपरिषदेसाठी नवीन रचनेनुसार 41 नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी घोषित करण्यात आलंय.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्यामुळे अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे,. त्यामुळेच हा संघर्ष टाळण्यासाठी अजित पवार जय पवारांना नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली होती. त्यामुळे बारामती नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अजितदादा धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीत अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी दिवसरात्र काम करताना जय पवार दिसून आले होते. त्याचवेळी पार्थनंतर आता अजितदादांच्या दुसर्‍या चिरंजीवांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा सुरू झाली होती.

त्यामुळे आता बारामती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादा जय पवारांना मैदानात उतरवतात का? आणि शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांना आव्हान देणार का? याचीच चर्चा आता सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरंधा घाटात दुचाकीचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

Kidney Detox Drinks: वेट लॉस ते किडनी Detox; 'या' भाज्याचं ज्यूस प्या, तब्येत राहिल फिट, आजार छुमंतर

Stomach cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी दिसतात 'हे' संकेत; सामान्य लक्षणं समजण्याची चूक करू नका

Accidnet News : सोलापुरात भीषण अपघात! २५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल, डिव्हायडर तोडला अन्...

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

SCROLL FOR NEXT