Amol Mitkari On Ajit Pawar Death Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: माझ्या सगळ्या कुटुंबाचं आयुष्य घ्या पण माझ्या दादाला परत आणा, आमदार खुर्चीवर डोकं ठेवून धायमोकलून रडला; पाहा VIDEO

Amol Mitkari On Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय नेत्यांना मोठा धक्का बसला. अमोल मिटकरी हे बारामतीमध्ये आले असून त्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांबद्दल बोलताना ते ढसाढसा रडले.

Priya More

Summary:

  • अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

  • अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू

  • अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अमोल मिटकरी ढसाढसा रडले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. सर्व राजकीय नेते बारामतीमध्ये दाखल झाले असून त्यांना देखील रडू अनावर झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी हे देखील बारामतीमध्ये आले आहेत. यावेळी अमोल मिटकरी ढसाढसा रडले. 'माझा विश्वास नाही देवावर, तो असता तर दादा नसता गेला.', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अमोल मिटकरी यांनी यावेळी रडत रडत सांगितले की, 'देव नावाचा माणूस जर शिल्लक असेल तर माझ्या सगळ्या कुटुंबाचं आयुष्य त्यानं घ्यावं. माझ्या लेकराबाळाचं, माझं, माझ्या बायकोचं, माझ्या घरात जेवढे जिवंत असतील त्याचं घ्यावं पण माझ्या दादाला जिवंत आणावं. मला दादांनी राजकीय जन्म दिला. हा कपडा सुद्धा अजितदादाचा आहे माझ्या अंगावर. हे कपडे, बनियान, हे घड्याळ हे सर्व देव माणसाचं आहे माझ्या अंगावर. माझ्याजवळ माझं काही नव्हतं.'

अजितदादा गेल्यामुळे आता आमचं राजकारण करिअर संपलं असल्याचे मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, 'माझी लेकरंबाळं शिकत आहेत. दहावीमध्ये माझी मुलगी आहे. त्यांना चांगल्या शाळेत शिकवू शकतो ते फक्त दादामुळं. मला विश्वास नाही देव माणूस या वस्तूवर. तो असता तर दादा नसता गेला. माझ्या जीवनात तरी काय राहिले. त्या माणसाने मला राजकीय जन्म दिला. माझा दादा नाही आता जगण्यात तरी काय अर्थ. आमचं पॉलिटिकल करिअर संपलं. आम्हाला राजकारण करायचे नाही. कुणी नाही आमचे मुंबईत दिल्लीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT