ajit pawar saam tv
महाराष्ट्र

साता-याच्या एमआयडीसीतला खंडणीखोर कोण? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आले हाेते.

ओंकार कदम

सातारा : मी कुठल्या ही सोम्या गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही असे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी पवरांवर केलेल्या ट्विटवरुन माध्यमांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (रविवार) सातारा (satara) जिल्ह्यातील माण तालुक्यात आले हाेते. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांवर पवार यांनी उत्तर देताना राणेंवर माेजक्या शब्दांत टीका केली. (ajit pawar latest news)

दरम्यान पत्रकारांवर अजित पवार आज थाेडे नाराज असल्याचे दिसून आले. कार्यक्रमापुर्वी देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद टाळला. कार्यक्रमानंतर देखील पवार यांनी माेजक्याच प्रश्नांना उत्तर दिले.

साता-याच्या एमआयडीसी मधील खंडणीबाबत मंत्री पवार यांनी त्यांच्या भाषणात काेणाचा ही विशेष उल्लेख न करता समाचार घेतला. त्याचा धागा पकडत काही माध्यम प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री पवार यांना साता-याच्या एमआयडीसीतील खंडणीखोर कोण असा प्रश्न केला. त्यावर मंत्री पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी तुम्हांला माहित नाही असे विचारताच प्रतिनिधींनी नाही म्हटले. त्यावर मंत्री पवार यांनी कधी तरी खरं बाेलायला शिका अशी टिप्पणी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT