ajit pawar and narayan rane 
महाराष्ट्र

राणेंचे अभिनंदन करीत जूना किस्सा सांगून अजित पवारांनी काढला चिमटा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा दाै-यावर आले आहेत.

ओंकार कदम

सातारा : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विजयानंतर (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आणि निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले. त्यानंतर राणेंच्या आता महाराष्ट्रावर लक्ष या घाेषणेवर उपमुख्यमंत्री पवार यांनी राणेंना चिमटा काढत १९९९-२००४ चा सरकार स्थापनेचा किस्सा सांगितला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे आज सातारा (satara) जिल्हा दाै-यावर आले आहेत. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निकालाबाबत पवार म्हणाले निवडणुकीत यश अपयश येतच असत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅक फुटवर जावं लागलं. सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी चांगलं यश मिळालं.

नारायण राणेंनी (narayan rane) पुढे काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास सुद्धा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच विरोधकांना खडे बोल सूनवाले. हे महाविकास आघाडीचे सरकार पडेल अशी चर्चा सातत्याने केली जात आहे. आता नारायण राणेंच्या रुपाने आणखी एक माणूस आला आहे. खरतर नारायण राणेंनी मागे असेच सन १९९९ ते २००४ कालावधीत सरकार पाडण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही याचा दाखला देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राणेंना चिमटा काढला.

असे घडले हाेते तेंव्हा

सन १९९९ विधानसभा निवडणुकीत सेना (६९) आणि भाजप (५६) एकत्र लढले हाेते. भाजपने (bjp) मागणी करुनही शिवसेना (shivsena) प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षास मुख्यमंत्रीपद दिले नाही. त्यावेळी भाजप नेते गाेपीनाथ मुंडे आणि शिवसेना नेते नारायण राणे हे पदाचे दावेदार हाेते. राणेंनी प्रयत्न करुन ही सेनेला सत्ता स्थापन करता आली नव्हती.

त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) आणि काॅंग्रेस (congress) निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र झाले आणि अपक्ष आमदारांना सोबत घेऊन आघाडीने सरकार स्थापन केले. त्यावेळी (कै.) विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT