Ajit Pawar & Nana Patole Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar: 'मविआ' त धूसफूस? तिघे असल्याने भांड्याला भांड लागणारच : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.

Siddharth Latkar, ओंकार कदम

कराड : एका कुटुंबात भांड्याला भांडे लागते. इथे तर तीन आहेत. थाेडे फार इकडे तिकडे हाेणारच. परंतु ते हाेऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेलेंच्या (nana patole) नाराजीबाबतच्या प्रश्नावर व्यक्त केले. (ajit pawar latest marathi news)

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा (satara) जिल्हा दाै-यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांनी उपमुख्यमंत्री पवार यांना नाना पटाेलेंनी पक्षाध्यक्ष साेनिया गांधी यांच्याकडे मविआतील (mva) घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बाबत तक्रारी केल्या आहेत. यावर तुमचे काय मत आहे असे विचारले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले त्यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याला फार काही महत्त्व द्यायचे कारण नाही. त्यांनी त्यांच्या नेत्यांना (leaders) काय सांगावे हा त्यांचा अधिकार आहे. देशाने अनेक सरकार पाहिली आहेत.

एका कुटुंबात असताना भांड्याला भांड लागते. इथे तर तीन कुटुंब आहेत. भांड्याला भांड हे लागणारच परंतु ते लागू नये म्हणून प्रयत्न करावा. हे सरकार नीट चालले पाहिजे, चालवले पाहिजे असे देखील पवार यांनी नमूद केले.

देशातील तसेच राज्यातील विविध पक्षांनी, नेत्यांनी महत्वाच्या प्रश्नांवर बाेलले पाहिजे. ते साेडून भरकटणारी चर्चा केली जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती हरखून चालला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली दिशा भरकटत आहे. टाळी एक हाताने वाजत नाही हे ही तुम्ही लक्षात घ्या. सर्वांनीच समजंस वागले पाहिजे असे पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT