Ajit Pawar Saam Digital
महाराष्ट्र

Ajit Pawar : दादांना वेशांतर भोवणार? वेशांतरावरुन विरोधकांनी दादांना घेरलं, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Maharashtra Politics 2024 : महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार दिल्लीला अमित शाहांच्या भेटण्यासाठी वेशांतर करून जात होते. आता याच मुद्यावरून विरोधकांनी अजितदादांना घेरलंय.

Sandeep Gawade

अजित पवारांना अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेली कबुली चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवार दिल्लीला अमित शाहांच्या भेटण्यासाठी वेशांतर करून जात होते. आता याच मुद्यावरून विरोधकांनी अजितदादांना घेरलंय. अजितदादांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केलीय. सत्तांतरात वेशांतराची काय भूमिका होती यावरचा हा रिपोर्ट..

महायुती सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला दहा वेळा वेश बदलून गेलो, अशी कबुली अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली आणि विरोधकांना आयतं कोलीत मिळालं. विरोधकांनी थेट केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेवरच बोट ठेवलंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणी विमानतळ प्रशासन, विमान कंपनी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला धारेवर धरलंय. विरोधकांनी हा मुद्दा थेट दहशतवादाशीच जोडलाय.

गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. मात्र त्यात एक समान धागा होता तो वेशांतराचा. शिंदेंचं ऐतिहासिक बंड झालं त्यावेळीही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेशांतर करुन भेटायचे असं जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं. आता अजित पवारांच्या वेशांतरामुळे नवा वाद रंगतोय. आधीच अजित दादांवर चहुबाजुंनी टीका होत असताना वेशांतराच्या नव्या मुद्द्याचं कोलीत विरोधकांच्या हाती आलंय. त्यामुळे दादांना वेशांतर भोवण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: शिपाई ते IAS अधिकारी; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून तणाव; ग्रामपंचायतीची मुख्य बाजारपेठेत धडक कारवाई

Railway Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद, काय आहे या मागचं कारण?

दरवाढीचा भडका! डिझेल २५ रुपये, तर पेट्रोल इतक्या रूपयांनी महागण्याची शक्यता; पेट्रोलियम मंत्री नेमकं काय म्हणाले?

Weekly Horoscope: या राशीच्या व्यक्तींना अजिबात कामाचा ताण घेऊ नये, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT