Ajit Pawar News saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: फडणवीसांपेक्षा शिंदेंना जनता अनुकूल, भाजपला मान्य आहे का? अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीवरून राजकारण चांगलंच रंगलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या जाहिरातीवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

Ajit Pawar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीवरून राजकारण चांगलंच रंगलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या जाहिरातीवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील या पानभर जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला टोला लगावला आहे. ' या जाहिरातील सर्व्हेत देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना जनता अनुकूल आहे, भाजपला मान्य आहे का? असा सवाल अजित पवारांनी केला. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, ' देशात मोदी अन् राज्यात शिंदे, हे भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का? याबाबत नेहमी खुलासा करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहिरातीबाबत खुलासा ऐकायला आवडेल'.

या जाहिरातीवरून अजित पवार पुढे म्हणाले, 'तुम्ही म्हणाल अजित पवारांनी नाक खुपसायचं कारण काय? बरं बाबा मी या प्रकरणात नाक खुपसत नाही. परंतु राज्यातल्या मुख्यमंत्र्यांबाबतची जाहिरात आहे. त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष सहभागी आहे. त्यामुळे याबाबत खुलासा करावा'.

अजित पवार पुढे म्हणाले, 'या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे यांना जनता अनुकूल असल्याचं सांगण्यात आलंय. हे भाजपला मान्य आहे का? शिंदे यांच्या बाजूने २६ टक्क्यांचा कौल दाखवलेला आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने २३ टक्के कौल दाखवलेला आहे. अशा पानभर जाहिराती देण्याची गरज काय? हे आम्हाला माहिती नाही. जनतेला सगळं कळतं. या जाहिरातीमुळे त्यांनी त्यांचं हसू करून घेतलं आहे'.

निवडणुकीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'या जाहिरातीवर विश्वास असेल तर उद्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा. यानंतर कळेल की, कुणाच्या पाठिशी किती लोक आहेत, असं आव्हान अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं आहे.

सरकारला खरंच विश्वास असेल तर उद्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा. कुणाच्या पाठिशी किती लोक आहेत, हे लक्षात येतं; असं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

Chanakya Niti: वैवाहिक जीवन क्षणार्धात होईल उद्ध्वस्त; बायकोने 'या' 3 गोष्टी नवऱ्यापासून नेहमी लपवूनच ठेवाव्यात

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT