Ajit_Pawar _Budget_2025 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Budget 2025: खाते वाटपानंतर लगेच अजित पवारांचा मोठा निर्णय, ३ मार्च २०२५ला मांडणार अर्थसंकल्प

Budget 2025: अजित पवार मंगळवारी (२४ डिसेंबर) अर्थ खात्याचा पदभार स्विकारणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी अर्थसंकल्पाविषयीची घोषणा केली आहे.

Saam Tv

Ajit Pawar: राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काल (२१ डिसेंबर) रोजी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यासह ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती प्रसासन अशी महत्त्वपूर्ण खाती स्वत:कडे ठेवली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याचा भार देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

अर्थ खातं मिळाल्याच्या काही तासांमध्येच अजित पवार यांनी अर्थसंकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्याचा पुढील अर्थसंकल्प हा ३ मार्च २०२५ रोजी सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विश्वासात घेऊन, चर्चा करुन अर्थसंकल्प तयार करायचा आहे असेही त्याने म्हटले. अजित पवार मंगळवारी (२४ डिसेंबर) रोजी अर्थ खात्याचा पदभार स्विकारणार आहेत.

माध्यमांना अर्थसंकल्पाविषयीची माहिती देताना अजित पवार यांनी खातेवाटपावरही भाष्य केले. "काल खाते वाटप झालं. एकूण मंत्र्यांची संख्या जास्त आहे, तर राज्यमंत्री कमी आहेत. प्रत्येक मंत्र्याला एक-एक खाते देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे. मंत्रिमंडळात काहीजण समाधानी आहेत, तर काहीजण असमाधानी आहेत. पण हे असं होतच राहणार. शेवटी प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या खात्याला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा असतो", असे अजित पवार यांनी म्हटले.

अजित पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर काल रात्रीच ते बारामतीमध्ये दाखल झाले होते. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी बारामती शहरात सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करायला सुरुवात केली. पुढील कार्यक्रमांना ते उपस्थितही राहणार आहेत. संध्याकाळी बारामतीकरांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कारदेखील होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT