नाशिकच्या येवला तालुक्यासह शहरात गेल्या अनेक दिवसानंतर जोरदार पावसाने संध्याकाळी 6 वाजेदरम्यान हजेरी लावली. अनेक दिवसानंतर झालेल्या पावसाने येवला शहरातील अनेक भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. याच पाण्यातून वाहनधारक वाट काढत होते. तर या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला असून कापूस,सोयाबीन,मका,बाजरी या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात रविवारी एका महामार्गावर भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात कारमधील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही भयंकर दुर्घटना डेडादरा गावात रविवारी साडे तीन वाजता अपघात घडला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तू आमदार झाला नसतास असं वक्तव्य केलं. यावरून आता भाजपचे नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे याबाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. अजित पवार हे वक्तव्य सातत्याने पुन्हा पुन्हा करून शिळ्या कडीला उत का आणतायेत ? असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केलाय.
विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत
राणा दांपत्याकडून दहीहंडी स्पर्धेत आयोजन
आमदार रवी राणा आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या वतीने विदर्भातील सर्वात मोठी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आली..
दही हंडीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित
सोबतच यावेळी अभिनेते रणधीप हुद्दा, अर्जुन कपूर तमन्ना भाटिया, अजय मोहिते आणि सिद्धार्थ जाधव यानी लावली हजेरी...
यावर्षीची दहीहंडी ही ऑपरेशन सिंदूरला समर्पित असून दिवसभर वेगवेगळे कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे...
डिस्चार्ज झालेला रुग्ण दगावल्याने हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांकडून तोडफोड
उल्हासनगरच्या क्रिटिकेअर हॉस्पिटल येथील घटना
हॉस्पिटल विरोधात हलगर्जीपणाचा आरोप
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दुपारपर्यंत निरभ्र वातावरण असताना अचानक मेघ दाटून येत भंडारा जिह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. भंडाराच्या साकोलीत पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. अचानक आलेल्या पावसामुळं दुचाकी चालकांची चांगलीचं तारांबळ उडाली. पावसापासून वाचण्यासाठी दुचाकी चालकांना मार्गावरील बस थांबल्यावर तथा साकोलीतील उड्डाणपूलाच्या खालील भागाचा सहारा घ्यावा लागला. मागील काही दिवसांपासून कमी-अधिक पावसानं हजेरी लावली आहे. आता जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
- अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात
- दुध गाडीची ट्रकला पाठीमागुन धडक दिल्याने अपघात
- भिषण अपघातात दुध गाडीतुन प्रवास करणा-या तिघांचा मृत्यु
- कुटुंबातील वर्षश्राद्ध च्या कार्यक्रमासाठी येत असताना बाप लेकासह वयोवृद्ध आजीचा अपघातात दुदैवी मृत्यु
- ज्ञानेश्वर वाजे,युवांश वाजे ,आणि शांताबाई वाजे असे अपघातात मृत्यु झालेल्या प्रवाशांची नावे
राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला
राधानगरीचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले
स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 उघडले
स्वयंचलित 4 दरवाज्या मधून 5712 क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून 1500 क्युसेक असा एकूण 7212 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू
नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा
मुसळधार पाऊस आणि अपूर्ण कामांचा वाहनचालकांना फटका
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी
संगमेश्वर बसस्थानक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा
पुलाच्या अपूर्ण कामामुळे आणखीन वाहतूक कोंडी
विकेंड असल्यामुळे वाहनाची महामार्गावर मोठी वर्दळ
पुण्यात आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुण्याच्या वतीने पेशवे जयंतीनिमित्त टू व्हीलर रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. दरम्यान रॅलीमध्ये सहभाग घेत भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः दुचाकी चालवली. पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरापासून सुरू झालेली रॅलीची सांगता ऐतिहासिक अशा शनिवार वाडा याठिकाणी झाली. रॅलीमध्ये एक विंटेज कार सजवून लहान मुलांनी पेशवे कुटुंबीयातील विविध सदस्यांची वेशभूषा परिधान केली होती...
सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या वतीने आज तनिष्कांसाठी महिला दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तनिष्कांसाठी आयोजित विविध कार्यक्रमाच्या अंतर्गत आज सिंहगड रोड परिसरातील सनसिटी रस्त्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
श्री आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान आणि तनिष्का गटप्रमुख पल्लवी चाकणकर यांच्यासह संपूर्ण गटाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी दहीहंडीचे पूजन करून ढोल ताशांचा गजर करण्यात आला तसेच सेलिब्रिटी म्हणून सिने अभिनेत्री त्रिधा चौधरी ने उपस्थिती लावली होती. दही हंडीचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते....
सिंधुदुर्ग -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे.
काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती.
मात्र जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची संततधार सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, मालवण तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे.
तर सह्याद्री पट्ट्यातील गावातही संततधार रीपरीप सुरू आहे.
हवामान विभागाकडून दुपारनंतर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बीड -
- कर्जमाफी, पीक विमा आणि शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावर राज्य सरकारला जाब विचारणार.
- अखिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांचा सरकारला इशारा.
बुलडाणा -
जांभोरा येथील पाझर तलाव फुटला
शेकडो एकर शेती गेल्या खरडून
सिंदखेडराजा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान
कोल्हापूर-
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंचसे उद्घाटन सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित
यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक
पंचनामे न करता तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी
संततधार पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले
पैनगंगा नदीच्या पुरामुळे शकोडो हेक्टर पिक वाहून गेलं
हिंगोलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तिन्ही मोठे पाण्याचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले
येलदरी, ईसापुर धरणासह आता सिद्धेश्वर धरण देखील भरले
तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे
परभणी -
भर पावसामध्ये सकाळपासूनच जिल्हाधिकाऱ्यांकडून लिमला महसूल पिकांच्या नुकसानीची पाहणी
स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शेतात साचलेल्या पाण्यात जाऊन केली पाहणी
नांदेड -
पैनगंगा नदीच्या पुरात दोन निलगाय गेल्या वाहून
नांदेडच्या माहूर तालुक्यातील पडसा पुलावरील घटना
जोरदार पावसामुळे वन्यप्राणी ही मोठ्या प्रमाणात दगावल्याची भीती
पुणे -
पुण्यात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार
आईला निरोप देताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितला आश्रु अनावर
तेजस्विनी पंडित यांनी केले अंत्यविधी
जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी
कठुआ जिल्ह्यात ढगफुटी
आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू
शिवसेनेचे हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना गावकऱ्यांनी विरोध केला आहे. बाबुराव कदम कोहळीकर हे आज नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते.बाबुराव कदम कोहळीकर यांना गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला.कोहळीकर यांच्यासमोर गावकऱ्यांनी जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या.पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरत असल्याने हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी दरवर्षी त्रस्त असतात.सहस्त्रकुंड येथे जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आल्याने हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावं विस्थापित होण्याची भीती आहे. त्यामुळे गावकरी आणि शेतकरी या प्रकल्पाला विरोध करताना दिसत आहेत.
संजय राऊत म्हणजे मीडियाच्या माध्यमातून जनतेची करमणूक करणारं पात्र आहे, असे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. कोट्यावधीचा व्यवहार करून एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून लोकशाही पद्धतीनेच पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी सांगितले.
मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराची तहान लागणारे पवना धरण 95 टक्के भरले आह. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातून गाळ काढल्याने पाणी साठ्याच्या क्षमता वाढल्याचे खासदार यांनी म्हटले. यावेळी पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये देवाच्या गाभाऱ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या महिला व पुरुष सुरक्षा कर्मचार्यांना हॅन्डगोल्ज वापरणे आज पासून बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गाभार्यात दर्शन रांग गतीमान करताना कर्मचाऱ्यांकडून भाविकांना स्पर्श करावा लागतो. त्यामुळे भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. हे वाद टाळण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी हॅन्डगोल्ज वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुण्यातील नारायण पेठ परिसरातील बाहेरचे गुंड आणून दहशत पसरवण्याच प्रयत्न करण्यात आली. स्वप्नील मोरे यांनी मुरलीधर हॉटेलच्या मारुती मंदीरास लोखंडी फलक (६ बाय ८ फुटी) लावण्याचा घाट घातला होता. मात्र तेथील दुकानदार, गोपाळ तिवारी कामा निमित्त आलेल्या हर्ष शिर्के यांनी नागरीक व ग्राहकांना अडचणीचा व धोकादायक ठरणार असल्याने, तो लाऊ दिला नाही.. दरम्यान हर्ष व स्वप्नील मोरे व त्यांचे ३/४ सहकारी यांच्या झटापट ही झाली होती. बोर्ड काढल्यानंतर गोपाळ तिवारी यांनी हा विषय सोडून दिला होता,मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता हर्षचा भाऊ मुकुंद शिर्के व निखील जगताप दोघे मोपेडवरुन जात असताना स्वप्नील मोरे व त्याच्या १० ते १५ जणांनी त्यांची गाडी अडवली. काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का, असे म्हणून ते दोघांच्या अंगावर आले. स्वप्नील याने लोखंडी रोडने मुकुंद शिर्के याच्या पाठीवर मारले. त्याच्या साथीदाराने निखील जगताप यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना दगडे फेकून मारले. तसेच त्यांच्या मोटारसायकलवर दगडाने व लाकडी बांबुने तोडफोड करुन नुकसान केले. पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करीत आहेत. याबाबत फिर्याद देणारा मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकांविरुद्ध या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्या असून या प्रकरणाचे सीसीटीव्ही आता समोर आला आहे.
नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे नांदेड शहरा जवळून वाहणाऱ्या आसना नदीला मोठा पूर आला आहे.आसना नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. मागील दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने दाना दान उडवली आहे.आसना नदीच्या पुराचे पाणी शेतीत शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पैनगंगा, कयाधू, आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने या नदी काठच्या गावाला आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.आसना नदीवरून पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
गडनदीची पाणीपातळी वाढल्यानं माखजन बाजारपेठेत पुन्हा शिरु लागलं पाणी
दोन दिवसात दुस-यांदा माखजन बाजारपेठेत भरलं पुराचं पाणी
बाजारपेठेतील सात ते आठ दुकानांत शिरलं पुराचं पाणी
सतत पुराचं पाणी भरत असल्यानं व्यापा-यांच होतय नुकसान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचे वितरण
कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित
दहिटणे येथील 1128 तर शेळगी येथील 220 घरकुलांचे वितरण होणार
या प्रकल्पातून असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती होत आहे
राज्य शासनाच्या नगरोत्थान महाभियानंतर्गत मंजूर झालेल्या रु 33 कोटींच्या निधीतून रस्ते, विकास, ड्रेनेज, पाणी पुरवठा, पाइपलाइन या सुविधांची उपलब्धता
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी
खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात घुसलं पाणी
खेड बाजारपेठेतील व नदी लगतच्या नागरी वस्तीतील शहरवासीयांना सतर्कतेच्या सूचना
जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 83.33 मिलीमीटर पावसाची नोंद
खेड तालुक्यात सर्वाधिक 178.71 मिलीमीटर पावसाची नोंद
तर चिपळूण आणि चिपळूणमध्ये 125 मिलीमीटर पाऊस
मंडणगडमध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद
उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम
वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार पाऊस झाला असून,यात जिल्ह्यातील 14 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
त्यामुळं हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय.
जिल्ह्यातील पैनगंगा,अडाण,काटेपूर्णा आणि पूस या प्रमुख नाद्यांसह इतरही सर्व छोट्या नदी नाल्याला मोठा पूर आला होता.
त्यामुळं खरीप हंगामातील सोयाबीन, हळद,कपाशी, उडीद,मूग ही पीकं पुरात वाहून गेलीत तर काही ठिकाणी जमीनही पूर्णतः खरडून गेलीये त्यामुळं शतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडांशी आलेला हिरावला गेलाय.
त्यामुळं या नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायेत.
मराठा आरक्षणासाठी मराठी क्रांती ठोक मोर्चा देखील मैदानात उतरला आहे अहिल्यानगर येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चा ने आरक्षणासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा राज्याचा नसून केंद्र सरकारच्या आखतारीतील आहे त्यामुळे राज्यात आरक्षणासाठी आंदोलन उपयोगाचे नसून दिल्ली येथे आंदोलनाचं हत्यार उपसावं लागणार आहे असं बैठकी मध्ये निर्णय घेण्यात आला यासोबतच शरद पवारांनी 1994 साली मंडल आयोगाला मान्यता देऊन अनेक जातींचा ओबीसी मध्ये समावेश केला मात्र त्यांना त्यावेळी मराठा समाज दिसला नाही आता देखील शरद पवार यांनी मंडल यात्रा काढली आहे. त्यांना मराठ्यांसाठी एकही यात्रा काढावीशी वाटत नाही अशी टीका देखील या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना आंदोलकांनी केली आहे.
सोयाबीन,कपाशी,संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अमरावती जिल्ह्यात मोठे नुकसान
पुराच्या पाण्याने शेती खरडून गेल्याने पिके उभे करण्यासाठी लागलेला खर्च कसा निघणार? शेतकऱ्यांपुढे प्रश्न
आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे तात्काळ सरकारने नुकसानीचे पंचनामे करून आम्हाला मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी
भंडाऱ्याच्या चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणारं भाविकांचं वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच महिला गंभीर जखमी झाल्यात.
रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षा आरव्ही (५०) यांना तातडीनं नागपूरला हलविण्यात आलं असून उर्वरित चार जखमींवर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
ही घटना चांदपूर मार्गावरील महालगाव फाटा ते बिनाखी गावादरम्यान घडली.
जळगाव मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट महिला शक्तीकडून सर्व धर्मीय लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले असून अजित पवारांच्या जळगाव दौऱ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात रक्षाबंधनाने झाली आहे. याप्रसंगी महिला शक्ती गटाकडून सजग - सक्षम अभियानांतर्गत हेल्पलाइन नंबर चा शुभारंभ देखील करण्यात आला असून या हेल्पलाइन नंबर द्वारे महिलांना आपल्या समस्या तक्रारी म्हणता येणार आहे तसेच विविध शासकीय कामाबाबतही या हेल्पलाइन नंबर द्वारे महिलांना माहिती मिळणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल सकाळपासूनच संततधार पावसाने थैमान घातले होते अशात उमरखेड तालुक्यातील चातारी या गावात 130 तर सावळेश्वर गावात वीस आणि शिवाजीनगर येथील 80 घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात पाणी शिरल्याची आकडेवारी समोर आली आहे.
या दहीहंडीचे यावर्षीचे तेरावे वर्ष
पाच थर तयार करून गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी
जलसंपदा आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा असणार समावेश
पुणे शहरातील पाण्याची गळती आणि नासाडी थांबवण्यासाठी समिती करणार प्रयत्न
पुण्याच्या पाण्यावरून जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्या वाद पाहायला मिळतोय
मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी महापालिका उचलते अस जलंसपदा विभागाच म्हणणं आहे
मात्र आता दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची तयार केली कृती समिती
शहरातील पाण्याच्या वापरावर समिती ठेवणार लक्ष
पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आवाहन करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, "अण्णा आतातरी उठा.
देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना.
अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?" असा मजकूर या फ्लेक्सवर लावण्यात आला आहे.
"अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे", असं आवाहन सुद्धा या फ्लेक्सचा माध्यमातून करण्यात आलं आहे.
पुण्याच्या पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या वतीने हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
एकट्या अमरावती जिल्ह्यात सात हजार हेक्टर पिके बाधित. कपाशीच्या शेतात गुडघाभर साचले पाणी...
जवळपास साडेचारशे पेक्षा अधिक घरांची पडझड; नदी नाल्यांना पूर, शेतांचे झाले तलाव...
अमरावती जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन ,तूर आणि संत्रा बागांचे मोठे नुकसान...
चांदूर बाजार तालुक्यात आणि तिवसा तालुक्यातील अनेक गावात शिरले पुराचे पाणी...
सर्वाधिक नुकसान चांदूरबाजार आणि तिवसा तालुक्यात...
बेरजेचे राजकारण करा वजाबाकीचे राजकारण करू नका,आणि जातीवाद कधी होता कामा नये, अश्या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठीचा सल्ला दिला आहे,सांगलीच्या मिरजेमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
पक्ष वाढीच्या दृष्टीने यापुढे आपण मुंबईत तीन दिवस आणि चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार असून बीडमधून त्याची सुरुवात देखील आपण केली आहे.
त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी देखील यापुढे बेरजेचं राजकारण करावं, वजाबाकी करू नये माणसं जोडली पाहिजेत आणि जातीवाद होता काम नये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवण लक्ष्यात घेऊन पुढे गेले पाहिजे, असं मत देखील मुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केले आहे.
कयाधू नदीला पूर आल्याने नांदेडच्या हदगाव तालुक्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला.
कयाधू नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
हदगाव तालुक्यातील धानोरा येथील पुलावरून गया दोन नदीचे पाणी.
पूल बंद असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला.
हदगाव तालुक्यात पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान.
लातूर शहरासह, अंबाजोगाई कळंब, या प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणारं मांजरा धरण 95 टक्के भरले आहे .
दरम्यान धरणाचे चार दरवाजे उघडून मांजरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करून देतोय.
मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला.
दरम्यान पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात धरण भरल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे,
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्डे तात्पुरता डाग डीजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल ते नवीन बस स्थानकपर्यंत असलेला हा 100 मीटरचा रस्ता या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून 500 हून अधिक खड्डे या रस्त्यावर पडले होते या संदर्भात महापालिकेकडे नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले होते मात्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून याच रस्त्यावरून ते जाणार असल्याने महापालिका ही ॲक्शन मोडवर आल्याचा पाहायला मिळत आहे
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घोडकी परीसरात मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे.
सोयाबीन शेतात अक्षरशः पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे.
यातच काल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतीची पाहणी केली व तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले माञ केवळ पंचनामे नको तर तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
पुण्यासह अखिल भारतीय औषध विक्रेत्या संघटनांनी औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीबाबत सरकारला गंभीर इशारा
संघटनेने ‘१० मिनिटांत औषध वितरण’ करणाऱ्या ई-फार्मसी कंपन्यांवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी केली आहे
या मागणीला पुणे केमिस्ट असोसिएशन ने देखील दिला पाठिंबा
औषधे नेमकी कोठून येतात, ते योग्य तापमानात ठेवलेली असतात का याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत
अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अमली पदार्थविरोधात आज भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन..
मॅरेथॉन स्पर्धेत अमरावती शहर पोलीस दलातील अधिकारी आणि शेकडो कर्मचारी सहभागी..
पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दाखवली मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी..
यापूर्वीही सायकल रॅली काढून केली होती जनजागृती.
अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावरून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्क जवळ भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटले असून ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर अडकल्याने मोठा अपघात टळला आहे. मांजराज पार्क जवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून उतरताना ही घटना घडली असून सुदैवाने अनियंत्रित झालेला ट्रक दुभाजकाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे चांदणी धरणाचे दरवाजे न उघडल्यामुळे शेतात पाणी येऊन शेती पिकांचे मोठ नुकसान
मिरची, कापूस ही पिके पाण्यात असून उडीद व मुगाची ही मोठ नुकसान
त्वरित पंचनामे करून शासनाने मदत देण्याची मागणी
परंडा तालुक्यातील सिरसाव येथील शेतकरी महिला गवले यांनी केली मागणी
भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यात लाखांदूर तालुक्यातील चपराळ पहाडीजवळ पाळीव बकऱ्या आणि गुरे चराई करणाऱ्या पशुपालकाच्या अंगावर वीज कोसळल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला. मनोहर कुंभले (६८) असं मृत पशुपालकाचं नावं आहे. अचानक आलेल्या या पावसानं जनजिवन विस्कळीत झालं असलं तरी शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासादायक ठरला आहे.
नाशिकच्या मालेगाव मध्ये दही हंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.भाजापा युवा संघटक देवा पाटील यांच्या देवाची मानाची दहीहंडी मोठ्या जल्लोषात दरवर्षी प्रमाणे यंदाही साजरी करण्यात आली.या दहीहंडी उत्सवात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.विश्वबंधू प्रतिष्ठाण च्या कार्यकत्यांनी सहा थर लावत दही हंडी फोडत जल्लोष केला.मालेगाव शहरात यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी ३० पेक्षा जास्त ठिकाणी दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला.
धुळ्यात संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात विविध ठिकाणी सकल भागात पाणी साचल्याचे बघावयास मिळाले आहे, तर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर देखील गुडघाभर पाणी साचल्याचे दिसून आले आहे,
धुळे शहरात संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या जोरदार झालेल्या पावसानंतर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर अक्षरशः जलमय परिस्थिती झाल्याचे दिसून आले आहे, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, त्याचबरोबर नागरिकांना देखील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोहोचताना गुडघ्याभर पाण्यामधून जावे लागले आहे,
संजय राऊत यांनी उत्तर महाराष्ट्रातील एक तरी महानगरपालिका जिंकून दाखवावी असे थेट आव्हानच मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिले आहे, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे, "'आपण प्रमोद महाजन नाही, जामनेरचे गिरीश महाजन आहात' राऊतांच्या या टीकेचा समाचार घेताना महाजन म्हणाले, "प्रमोदजींची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही, मात्र मी संजय राऊत यांच्यासारख्या केवळ तोंडाच्या वाफा सोडत नाही, तर कामाच्या जोरावर बोलतो"
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.