सांगली महापालिका क्षेत्रात १५ ऑगस्ट रोजी मटण, मांसविक्रीवर बंदी.
महापालिकेकडून बंदीचे आदेश
महापालिका आरोग्य विभागाकडून पालिका क्षेत्रात मटण-मांसबंदीचा आदेश जारी
पुण्यात जिम ट्रेनर लेडीने लोखंडी रॉड ने मारहाण करून केला तरुणाचा खून
दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रोटीन पझल शॉप या ठिकाणी आज संध्याकाळी गोपीनाथ ऊर्फ लल्ला वर्पे या तरुणाचा लोखंडी पार आणि लोखंडी रॉड ने बेदम मारहाण करून खून करण्यात आला आहे..
राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याची याचिका वकिलांनी घेतली मागे
राहुल गांधी जीवास धोका असल्याचा कोर्टातील दाव्यावर राहुल गांधी यांच्या वकिलांनी ज्युडीशल नोट PURSIS मागे घातली
एडवोकेट मिलिंद पवार यांनी याचिका घेतली मागे
सध्या गर्दीच्या वेळेत (९ ते ११, ४ ते ८) दर ७ मिनिटाला १ ट्रेन अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे सेवा उपलब्ध आहे. आता येत्या १५ तारखेपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर ६ मिनिटाला सेवा पुरविण्यात येणार आहे. विना गर्दीच्या वेळी मात्र दर १० मिनिटाला एक ट्रेन असणार आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई
जामीनावर बाहेर असलेल्या ४ आरोपींकडून ४ पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक गस्तीवर असताना मोठी कारवाई
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना परत पाठवण्याचा तर मंदिराकडे पशू वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असलेले प्रशांत सर्वगोड यांना बडर्तफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव विधि व न्याय खात्याकडे पाठवण्यात येणार आहे.
सांगली मध्ये येत्या 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे. तर सांगली जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा रणशिंग देखील फुंकण्यात येणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश देखील पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार गिरीश नायकवडी माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील,शहर अध्यक्ष पदमाकर जगदाळे व पदाधिकारी उपस्थित होते.
माणगावमध्ये मंत्री भरत गोगावले आणि आ. महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यात माणगाव नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांच्यासह इतर पक्षीय कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश झाला.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभुमीवर आजच्या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले.
यावेळी मंत्री भरत गोगावले आणि आ. महेंद्र थोरवे यांनी खा. सुनिल तटकरे यांना टिकेचे लक्ष केले.
माणगाव इथं आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
सुनील तटकरे यांच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा आहे. सुनील तटकरे यांनी रायगडला लुटले, ओरबाडून खाल्लं. सरकारी जमिनी सुद्धा लुटल्या असा आरोप थोरवे यांनी केला.
तुमच्या सुद्धा जमिनीचा सातबारा एकदा चेक करून बघा नाहीतर तो देखील ट्रान्फर झालेला असेल असा सल्ला त्यांनी उपस्थिताना दिला. आमच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सेवा असून सेवा करण्यासाठीच आम्हाला पालकमंत्री पद हवं असल्याचं थोरवे म्हणाले.
नाशिकमध्ये 15 ऑगस्टला शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध
महापालिकेचे आदेश जुमानणार नाही, खाटीक समाजाची भूमिका
१५ ऑगस्टला सर्व कत्तलखाने आणि मास विक्रीची दुकानं सुरूच ठेवणार
कुणी काय खावं आणि काय नाही याचे प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य
शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद निर्माण करू नये
ज्याला जे खायचंय ते खाण्याचा अधिकार घटनेनं दिलाय, नागरिकांच्या प्रतिक्रिया
सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील जंगली महाराज रस्ता जॅम
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
पुण्यातील जे एम रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
संध्याकाळच्या वेळी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हा रस्ता होतो आहे जॅम
शहरातील भिडे पूल बंद असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी जंगली महाराज रस्त्यावर वाहनांच्या लांबच रांगा
बालगंधर्व चौकापासून थेट खंडोजी बाबा चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
जालना येथे धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळा गावाजवळ क्रुझर जीपचा मोठा अपघात झालाय. जीपचा टायर फुटून झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झालेत. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
अमेरिकानं टॅरिफ लावल्यानंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांमधील जवळीकता वाढतेय. भारत ते चीनमधील विमान सेवा सुरू झाल्यानंतर आता चीनचे परराष्ट्रीय मंत्री पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर शिवारामध्ये २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे का घातपात आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी सदर महिला शारदा भारत पवार यांचे वय 28 वर्षे आहे व त्यांचा मुलगा आदर्श भारत पवार हे दोघेही जिंतूर च्या बामणी येथील रहिवाशी असुन शारदा यांना सिंदखेडराजा येथे दिलेले होते त्यांनी आत्महत्या केली आहे की काही घातपात आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
मत चोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. पुणे कोर्टात राहुल गांधींनी लेखी स्वरुपात याबाबत माहिती दिलीय.
गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजन केले आहे. यंदा फेस्टिवलचे दुसरे वर्ष आहे. फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५ च्या अध्यक्षस्थानी यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, स्वागताध्यक्षपदी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची, तर 'मार्गदर्शन समिती'च्या प्रमुखपदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.
१५ ऑगस्टला महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश
नाशिक महापालिकेच्या पशुवैदकीय विभागाने काढले आदेश
१५ ऑगस्टला कुणीही जनावरांची कत्तल करू नये, पालिका प्रशासनाच आवाहन
१५ ऑगस्टला जनावरांची कत्तल करतांना आढळल्यास कारवाईचा इशारा
बजाजनगरातील प्रताप चौकमध्ये किरकोळ वादातून दारूच्या नशेत असलेल्या तिघांना काही जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान कपडे फाटेपर्यंत मार देण्यात आला. , संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशा प्रकारच्या घटना येथे वारंवार घडत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कठोर आणि अचूक कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारावर नवी यंत्रणा सुरू केली असून, ‘प्रुफ ऑफ कन्सेप्ट’ (पीओसी) या प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत एआय कॅमेरे बसविलेली पोलिसांची गाडी जंगली महाराज व फर्ग्युसन रस्त्यावर गस्त घालत नियमभंग करणाऱ्या वाहनांवर तत्काळ ट्रॅक करून इ-चलनद्वारे कारवाई करणार आहे. ज्यामुळे नियमांचा भंग करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होईल, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.
यवतमाळच्या वणी तालुक्यातील कळमना येथील कार्तिकी कोलवाश्रीच्या कामगारांचे सलग नव्या दिवशी उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली असून या उपोषणाकडे कोलवाश्रीच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने उपोषणकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय.
वंचित बहुजन आघाडी मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे काय म्हणाले?
मुंबईत गेले अनेक वर्षे SRA प्रकल्प रखडलेले आहे.
वेळोवेळी SRA अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येत आहेत
पण SRA अधिकारी भेटत नाहीत.
आज जण आक्रोश मोर्चा SRA वर काढला आहे. हा जण आक्रोश मोर्चा एक आहे.
यानंतर पुढील मोर्चा जन आक्रोश मोर्चा २ होईल ते यापेक्षा मोठा होईल
महाराष्ट्र रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचे गेले 35 दिवसांपासून आदिवासी विकास भवनसमोर आंदोलन सुरू आहे सरकार सोबत चर्चा करून देखील आंदोलकांच्या मागण्या मान्य होत नाही. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आज नाशिक मध्ये असता त्यांनी आंदोलकांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत सरकारने तात्काळ या आदिवासी शिक्षकांच्या मागण्या मान्य करून त्यांना सेवेत रुजू करून घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली.
हातखंबा गुरववाडी इथल्या अवघड वळणावर अपघात
वळणाचा अंदाज न आल्याने टँकर पलटी
गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता टॅकर
सुदैवाने टँकर रिकामा असल्याने एलपीजी गॅस गळतीचा धोका नाही
हातखंबा गावाजवळ महिन्याभरात एलपीजी टॅकर अपघाताची तिसरी मोठी घटना
पुणे : आज सकाळी एक कॅब चालक हे पुणे रेल्वे स्टेशनच्या समोरून जात असताना त्यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कॅब चालकाच्या वाहनाला एका पोलिस कर्मचाऱ्याच्या गाडी ने थांबवत तू ट्रॅफिक अडवून लोकांना त्रास देत आहे असं सांगितलं. संबंधित पोलीस कर्मचारी आणि कॅब चालक यांच्यामध्ये यावरून वाद निर्माण झाला.
जैतापूर मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर भीषण अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्यात यात य एक महिलेचा मृत्यू झाला आहे.वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठार दिशेने निघालेल्या महिलांचा टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला आणि फरफटत गेला .यात टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातात टेम्पोचालक आणि केबिनमध्ये असलेले इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर काहींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
बीड जिल्हा कारागृहात बेकायदेशीर रित्या गांजा आणत त्याच्या वाटणीवरून इतर कैद्यांसोबत वाद घालणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले आहे. तर दरोडेखोर शाम उर्फ बाळू उत्तम पवार याला जालना येथील कारागरात पाठवण्यात आले आहे. गांजा आणण्याबरोबरच त्याच्या वाटणीवरून वाद घालणाऱ्या या चौघांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. दरम्यान या चौघांचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज देखील करण्यात आलेला आहे.. तत्पूर्वीच कारागृह प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खोक्याला हरसूल कारागृहात हलवले आहे.
रत्नागिरी-गणपतीपुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अखेर ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. भाविकांसाठी वेशभूषा नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
हातखंबा गुरववाडी इथल्या अवघड वळणावर अपघात
वळणाचा अंदाज न आल्याने टँकर पलटी
गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता टॅकर
सुदैवाने टँकर रिकामा असल्याने एलपीजी गॅस गळतीचा धोका नाही
हातखंबा गावाजवळ महिन्याभरात एलपीजी टॅकर अपघाताची तिसरी मोठी घटना
ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं ज्याने चुकीचं काम केलं ते त्याचं बघतील तुम्ही तुमचं काम करा. मी संपूर्ण वारकऱ्यांची माफी मागतो ज्यांनी चुकी केली त्याचा त्रास त्यांना होतोय आणि त्या चुकीची फळ त्यांना मिळत आहेत असं वक्तव्य करत आमदार शंकर मांडेकर यांना त्यांच्याच वाढदिवसाच्या कार्यक्रमात रडू कोसळलं. काही दिवसांपूर्वी मांडेकर यांचे बंधू यांनी एका कला केंद्रात गोळीबार केल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली होती. त्या प्रसंगाची आठवण येत शंकर मांडेकर यांनी काल भाषणात काही मुद्दे मांडले.
मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या वाहतुक कोंडी बाबत दिलासादायक बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील उड्डाण पुल गणेशोत्सवा पूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. माणगाव आणि महाडच्या दरम्यान असलेल्या या पुलाचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. यामुळे याच परिसरात मोठी वाहतुक कोंडी होत होती. या वर्षी या भागात वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून पुलाची एक बाजू वाहतुकी करता तात्पुर्ती खुली केली जाणार आहे.
राजकारणात कार्यकर्ता आपल्या नेत्याला देव मानतो. पंढरपुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी आपल्या नवीन घरातील देवघरात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमेची स्थापना केली आहे.
श्री शिंदे हे गरीब आणि सर्व सामान्य कुटुंबातून आले आहेत. आता पर्यंत ते एका भाड्याच्या घरात राहत होते. अनेक वर्षांच्या संघर्ष आणि कष्टा नंतर त्यांनी पंढरपुरात स्वतःचे घर घेतले आहे. त्यांनी नवीन घेतलेल्या घरातील देवघरात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमांची स्थापना केली आहे. ते दररोज देवघरातील कुलदैवतांबरोबरच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमांचीही ते मनोभावे पूजि करतात.अजित पवार हे वरून ठणक असले तरी ते आतून नारळाच्या पाण्याप्रमाणे गोड आहेत. त्यांच्यामुळे मी आज माझे स्वतःचे घर विकत घेऊ शकलो. त्यांचे आशिर्वाद आणि प्रेम माझा सारख्या गरीब कार्यकर्त्यावर आज ही आहे. त्यामुळे मी माझा देवघरात अजित पवार यांना स्थान दिल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
अमरावतीच्या पश्चिम विदर्भाच्या विभागीय मेळाव्याला संजय गायकवाड गैरहजर
आमदार संजय गायकवाड गैरहजर असल्याने चर्चांना उधान
संजय गायकवाड मेळाव्याला येणार का याकडे लागले सर्वांचे लक्ष
गायकवाड यांनी बुलढाणा येथे घेतलेल्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा फोटो न लावल्याने गायकवाड नाराज असल्याची झाली चर्चा
कोल्हापूरच्या बिंदू चौकात केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत ट्रम्प यांचा पुतळा जाळला
संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने कोल्हापुरात लक्षवेधी आंदोलन
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळताना पोलीस आणि आंदोलकात झटापट
भारत सरकार हे डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत का?- कॉम्रेड गिरीश फोंडे यांचा सवाल
- सोलापूर जवळील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तुळजापूर नाका येथील ओढा झाला ओव्हर फ्लो
- सोलापूर धुळे महामार्गावर ओढ्याचं पाणी आल्यामुळे वाहतूक झाली विस्कळीत
- तुळजापूर वरून सोलापूरकडे येणारी वाहतूक झाली संथगतीने
- सोलापूर - धुळे महामार्ग आणि सोलापूर - पुणे महामार्ग सर्विस रोड गेले पाण्याखाली
यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोर धरला असून बहुतांश तालुक्यांमध्ये रिमझिम तर काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसामुळे शेतीला दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी पिकांच्या मुळांजवळ पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे.हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील २४ ते ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना नदी-नाले, ओढे, तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील नागपूर आणि अमरावतीनंतर जळगाव बातमी स्वातंत्र्यदिनी मास विक्री बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जळगाव शहरात प्रथमच मांसविक्री करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जळगाव महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत. मटण मार्केटसह शहराच्या विविध भागात उघड्यावर मांसविक्री केली जाते. स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) या दिवशी मांसविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदी असलेल्या दिवशी व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई होणार आहे.
बच्चू कडू यांना नुकतीच मुंबई सेशन कोर्टाने सहा महिन्याची शिक्षा सुनावली यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, 2017,18 ला महापरीक्षा घोटाळा झाला होता परीक्षेमध्ये मास कॉपी होत होती मध्यप्रदेश मध्ये जो व्यापम घोटाळा झाला त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारने या परीक्षेचे काम दिलं होतं यावर आम्ही आंदोलन केले तक्रारी केल्या मात्र सरकारचं त्या कंपनीसोबत मिली बघत असल्याचे लक्षात आलं ही परीक्षा देणारे सगळे गरिबांचे मुलं होती या मुलांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केलं व त्यामुळे व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणात मुंबई शेशन न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा सुनावल्याचे प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. सेवा हमी कायदा निर्माण झाला मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही न्यायालय याकडे बघणार का असा प्रश्न देखील बच्चू कडू यांनी न्यायालयाला विचारला आहे. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला तर अशा पद्धतीने गुन्हे दाखल केले जाते मात्र असे गुन्हे दाखल होण्याला व शिक्षेपुढे आम्ही झुकणार नसून आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया प्रहारचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिली.
राज्यातल्या अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार यापुढे मी काढणार आहे. वी. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. या संस्थेचे अनिलकुमार गुप्ता यांची संस्थेबाबत वृत्ती 'वरून सज्जन, आतून चोर' अशीच आहे. संस्थेला होणार नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी तो हे महाशय स्वतःच्या फायद्यासाठी हजारो कोटींचा हा घोटाळा आहे याची संपूर्ण प्रकरणात चौकशी करावी असे मी पत्र छगन भुजबळ दिला आहे. भ्रष्टाचार पर चर्चा होऊन जाऊ द्या सरकार संरक्षण का देतोय सरकारच भ्रष्टाचारी आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.
शिवसेनेने वारंवार हया रस्त्याबाबत आवाज उठविला आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी या कडे दुर्लक्ष केले. महामार्गबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलवली, मात्र कोकणातील दोन्ही पालकमंत्र्याना बोलावलं नाही कारण त्यांना हे मंत्री काही कामाचे नाहीत हे माहित आहे. इथले खासदार नारायण राणे यांनी केवळ निवेदन देण्याचे काम केले प्रयत्न मात्र केले नाहीत.वैभव नाईक
मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डे व रखडलेल्या महामार्गाच्या प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळ हुमरमळा याठीकाणी चक्काजाम आंदोलन
माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक उतरले रस्त्यावर
महायुती सरकार विरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणा बाजी
महामार्गावर रांगोळी व दुधाचा केला अभिषेक
समृद्धी महामार्ग पुर्ण झाला मात्र मुंबई गोवा महामार्ग कित्येक वर्ष रखडला
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे खड्ड्यामुळे हाल.
गणेश चतुर्थी पुर्वी महामार्ग पुर्ण करणार म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा केला निषेध
अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू
हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्या परिसरात ही घटना घडली
नागपूर -
- झीरोमाईल मेट्रो स्टेशन परिसरात मनपाच्या धावत्या बसमध्ये शॉटसर्किटमुळे आग, प्रवासी सुखरूप
- मोर भवनमधून निघालेल्या स्टार बसमधून धूर निघाल्याने खळबळ..
- चालक आणि वाहकाने वेळीच बस झिरोमाइल चौकात थांबत प्रवाशांना काढले बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली
- त्यानंतर अग्निशमक सिलेंडरच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले.
पुणे -
पुण्यात अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी
शिवणे ते शिंदे पूल रस्त्यावर वाहतूक कोंडी
सकाळी वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने वाहतुकीच नियोजन कोलमडले
सकाळची वेळ असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे
नांदेड सिटी रस्त्यावरून शिवणे रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्यांमूळ वाहतूक कोंडीत भर
पुणे-
सलग चार दिवस पीएमपीचे उत्पन्न अडीच कोटींच्या घरात
रक्षा बंधन आणि सलग सुट्टयांमुळे प्रवाशांसाठी पीएमपीने ८ ते ११ ऑगस्टदरम्यान काही मार्गांवर जादा बस चालवल्या.
दोन्ही पालिकांसह पीएमआरडीएच्या हद्दीत चाललेल्या बससेवेमुळे पीएमपीला चार दिवसांत १० कोटी ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले.
रक्षाबंधन काळातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यावर्षी पीएमपीने ७,६९८ अतिरिक्त फेऱ्या केल्या.या बसमधून एकूण ४८ लाख ९२ हजार ८७८ प्रवाशांनी प्रवास केला.
अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात
शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण
अमरावती जिल्ह्यात अलर्ट जारी
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत नांदेड महापालिकेच्या वतीने आज सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली.
ही रॅली डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.
या रॅलीत विद्यार्थ्यांसह महिला,पुरुष जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुणे -
पुण्यात रोज ८० जणांना होतोय भटक्या कुत्र्यांचा श्वानदंश
पुण्यात सुमारे दोन लाख भटक्या कुत्र्यांची संख्या ..
लसीकरण आणि निर्बिजीकरणात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची अनास्था ..
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पुण्यातही अंमलबजावणी करण्याची मागणी
धाराशिव -
तुळजाभवानी मंदीर गाभाऱ्यात उंदराचा मुक्त संचार आढळल्यानंतर मंदीर प्रशासन अलर्ट मोडवर
तुळजाभवानी मंदीरात पेस्ट कंट्रोल करत माऊस टॅप,पिंजरे लावण्यात आले तर मंदीरातील खिडक्यांना लावल्या आल्या जाळ्या
तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार असल्याचा प्रकार ऑनलाईन दर्शनादरम्यान आला होता समोर
गुजरात मधील भावनगर येथील भाविकाला दिसला होता उंदीर,
तुळजाभवानी मंदीर प्रशासनाकडुन उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी उचलण्यात आली पावले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून ढगाळ वातावरण
जिल्ह्यात सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २९ मिमी पाऊस झाला
वैभववाडी, कुडाळ आणि मालवण तालुक्यात कालपासून पावसाचा जोर कायम
आज कुडाळ तालुक्यात आणि सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर दिसून येत आहे.
हवामान विभागाकडून पुढील ५ दिवसांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट
नाशिक -
- आदिवासी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल
- जवळपास १२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल
- आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुबंई नाका पोलिसात गुन्हा दाखल
- मागील ३५ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यलयासमोरील रस्त्यावर सुरू आहे आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारीवरील शिक्षकांचं बिऱ्हाड आंदोलन
चंद्रपुरमध्ये मुसळधार पाऊस
चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेला पाऊस कायम
मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल
शहरातील मित्र नगर परिसरातील घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी
रस्त्यांना आले नाल्याचे स्वरूप
शिरूर महसूल विभागाने अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला.
या कारवाईत तब्बल ८ फायबर बोटी आणि ६ बोटी जप्त करून जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या.
अचानक केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक -
- नाशिकमध्ये अनेक बनावट व्होटर आयडी आले समोर
- उबाठाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी केला पर्दाफाश..
- एकाच नावाने 3 बनावट व्होटर आयडी..
- तर एकाच व्यक्तीचे फोटो सारखे मात्र नावं वेगळे.
- एका आयडीवर नाव महिलेचे मात्र फोटो पुरुषाचा..
- असे अनेक बनावट कार्ड वितरित झाल्याचा संशय..
- हे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार..
- असे बनावट कार्ड तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
- पुणे पाठोपाठ आता नागपूर जिल्ह्यातही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे महाविद्यालय स्तरावर ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
- पुण्यात काल एन. एस यू .आय विरोध केला होता या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक रद्द सुद्धा केले होते.
- भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे नागपूर ग्रामीण मध्ये सुद्धा महाविद्यालयात वाईस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
अमरावती -
अमरावतीच्या अचलपूर येथे फिनले मिल कामगारांचे गेल्या ७ दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरूच
दोन कामगार चिमणीवर चढून करताहेत शोले स्टाईल आंदोलन
6 दिवस उलटून आंदोलनाची दखल न घेतल्याने आज पासून अन्नत्याग आंदोलन देखील सुरू
फिनले मिलमधील 700 कामगारच 26 महिन्यापासून वेतन थकले. 4 बोनस देखील थकले
मुंबईत आजपासून रंगणार शिवकालीन पारंपरिक खेळांचा थरार
लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांबचा समावेश
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची अनोखी संकल्पना
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचीही प्रमुख उपस्थिती
कुर्ला आयटीआयमध्ये १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन
पुणे -
खराडी रेव्ह पार्टी प्रकरण
प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुणे न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला आहे
या अर्जावर आज दुपारी तीन वाजता सुनवानी होणार आहे
न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष.
वर्धा -
- वर्ध्यात जोरदार पावसाला सुरुवात
- जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची हजेरी
- शेतीसाठी उपयुक्त ठरतोय पाऊस
- पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
- शेती कामांना येणार वेग
नागपूर -
नागपुरात सकाळपासून रिमझिम पाऊस
- आजपासून पुढील २ दिवस विदर्भात पावसाचा येलो अलर्ट
- 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
- ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून नागपूर सह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे
नागपूर
- रक्षाबंधनाचे औचित्य साधून यंदा १ कोटी ९३ लाख बहीण-भावांनी एसटी बसेसमधून केला प्रवास.
- एसटी महामंडळाला चार दिवसांत १३७.३७ कोटी रुपये प्राप्त.
- नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ४५ लाख ९५ हजार, २५९ रुपये आहे.
- यंदाच्या आर्थिक वर्षातील एसटीचे हे सर्वाधिक आहे.
- ८ ऑगस्टपासून तर ११ ऑगस्टपर्यंत सलग चार दिवस एसटीची प्रत्येक बस प्रवाशांनी खचाखच भरलेली आढळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.