अजित पवार अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत अपडेट
व्ही. के. सिंग पाठोपाठ रोहित सिंगची पण चौकशी होणार
व्हीएसआर कंपनीच्या मालकाची सीआयडीकडून दोन दिवस चौकशी
सीआयडी कडून व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची आज सुद्धा चौकशी
व्ही. के. सिंग यांच्या मुलाकडे देखील पुढील काळात चौकशी केली जाणार
पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथे मोबाईल टॉवरला भीषण आग लागली असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. टॉवर जास्त तापल्यामुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
पालघर जिल्ह्यात जलजीवन मिशनची एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली असताना देखील ठेकेदारांना शासनाकडून कामांची बिल मिळत नसल्याने आक्रमक झालेल्या पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेकडून आज पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पालघर जिल्ह्यात 565 पेक्षा अधिक ग्रामपंचायत मध्ये जलजीवन मिशन योजनेची काम करण्यात आले असून अनेक कामेही जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र काम पूर्ण झाली असता देखील शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदारांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यामध्ये शेकडो ठेकेदारांनी सहभाग घेतला असून लवकरात लवकर कामांची देयके वाटप करण्यात यावी अशी मागणी यावेळी ठेकेदारांकडून करण्यात आली.
सरकारच्या नव्या नियमानुसार विद्यार्थाच्या निवास स्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच निवडता येत होती. सरकारच्या या निर्णयाला ऍड. बोधी रामटेके आणि एड दीपक चटप यांनी आव्हान देत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर पंचायत समितीत अनोखी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. समितीत भाजपच्या 3, काँग्रेसच्या 3 आणि मनसेच्या 2 जागा निवडून आल्या होत्या. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनेही प्रयत्न केले, मात्र अखेरीस मनसेने भाजपसोबत युती केली. या युतीनंतर मनसेच्या मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी निवड झाली, तर भाजपचे शरद दरेकर उपसभापतीपदी विराजमान झाले. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चर्चा रंगली आहे.
नाशिकच्या मालेगावमधील किदवाई रोड परिसरात काही तरुण आणि महिलांनी तुफान राडा करत घड्याळांच्या दुकानावर हल्ला केला. हातात काठ्या घेऊन त्यांनी दुकानाची तोडफोड केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तोडफोडीमागील कारणांचा तपास सुरू केला आहे.
नालासोपाराच्या संतोष भवन परिसरात सकाळी साडेदहाच्या सुमारास पिसाटलेल्या रेड्याने अचानक धुमाकूळ घातला. रेड्याने एका दुचाकीला जोरदार धडक देत सामानाच्या दुकानात घुसल्याने मोठे नुकसान झाले. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली. अचानक घडलेल्या घटनेमुळे बाजारात गोंधळ उडाला आणि नागरिकांनी सुरक्षिततेसाठी पळापळ केली. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
अंबरनाथ मधील आनंद नगर एमआयडीसीत श्री गणेश केमिकल या कंपनीला भीषण आग लागली असून, गेल्या दीड तासापासून ही आग लागली असून कंपनीच्या गेटवर उभा असलेला एक केमिकलचा टँकर सुद्धा यात जळून खाक झाला आहे..
ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. सदर कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिमी व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या कामासाठी गुरूवार दिनांक 12/03/2026 रोजी सकाळी 9.00 ते शुक्रवार दिनांक 13/03/2026 रोजी सकाळी 9.00 पर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
आज पासून नविन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांना स्थगिती
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय
सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाच ठाण्यात रिक्षा चालकांकडून स्वागत
रिक्षा चालक मालक संघटनेकडून ठाण्यात पेढे वाटत केला आनंद व्यक्त
मोठ्या प्रमाणात रिक्षांचा सुळसुळाट वाढत असल्याने ठाण्यातील रिक्षा चालक मालक संघनेने सरनाईक यांच्याकडे केल्या होत्या अनेक तक्रारी
तर परिवहन मंत्र्यांनी आता ई चलन विरोधात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी रिक्षा चालकांची मागणी
अंबरनाथ आनंद नगर MIDC मध्ये लागली भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीला लागली आग लागली आहे.
आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात आरटीई प्रवेशाबाबत शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय.. कोपरगाव येथील एका शाळेऐवजी थेट मंदिराचे लोकेशन आरटीईच्या ऍडमिशन पोर्टलवर नमूद आहे.. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यास पालकांना अडचण निर्माण होत आहे.
लाकडी वखारात मोठ्या प्रमाणात बांबू साठवणूक करण्यात आले होती. झाडी झुडपाला आज्ञाताकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे लाकडी वखाराला लागली आग आहे. या आगीमुळे फळांचे तीन ते चार दुकान जळून खाक झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ २ मार्च रोजी झालेला शिक्षिका वृषाली गावंडे यांचा दुचाकी अपघात हा प्रत्यक्षात नियोजित खून असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
आम्ही जो निवडणुकीमध्ये शब्द दिला होता तो कर्जमाफीचा शब्द पूर्ण केला. मेळघाट मधील सर्व प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करेल. स्कायवॉक च काम सुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येईल. हे सरकार शेतकरी व सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे.
अकोला , अमरावती आणि वर्धा जिल्ह्यासाठी तापमानाचा 3 दिवसाचा ऍलो अलर्ट जाहीर
सासवडमधील दोन दिवसांचा मुक्काम आटपून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे सासवड मधून ज्या रस्त्याने मार्गस्थ मार्गस्थ होतो त्या रस्त्यावरील वीर फाटा ते बोरावके मळा आशा दीड किलो मीटर रस्त्याचे काम रखडले असून भूसंपादन होऊनही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसून रस्त्याचे कामही अपूर्ण आहे त्यामुळे भूसंपादन करून शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला द्यावा.
मावळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दमदार कामगिरी करत सर्व 15 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे भाजपचा मावळमध्ये पूर्णपणे धुव्वा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे महापालिकेसाठी आज महापालिका आयुक्त यांनी सादर केला अर्थसंकल्प
पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी कमी करणे तर उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे पुलांचे नियोजन
प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील पाच रस्त्यावर अँड पार्क चे नियोजन
रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पे अँड पार्क
पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील तीन पुलांचे काम पूर्ण होणार
घोरपडी रेल्वे पूल, आगाखान नदीवरील पूल, सनसिटी कर्वेनगर नदीवरील पूल पूर्ण करण्याचे नियोजन
१३ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ९० जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजपचे २८ सदस्य विजयी झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १२, शिवसेना (शिंदे गट)१०,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४ तर दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत.
आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे.त्यामुळे या ठिकाणी सभापती व उपसभापती पदांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उमेदवार निवडले.
राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेशासाठी लागू केलेल्या १ किमी अंतराच्या नव्या नियमामुळे अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
या विषयासाठी झोपलेल्या सरकारला आणि शिक्षण मंत्र्यांना जागे करण्यासाठी ' कुंभकर्ण ' आंदोलन.
मनसे विद्यार्थी सेनेचे आंदोलन...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी करत सरकारचा केला निषेध आहे परभणीत जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज सरकारचा निषेध व्यक्त करत अर्थसंकल्पाची होळी केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आमचे सरकार सत्तेवर आणा असे आश्वासन दिले होते आता राज्यामध्ये भाजप महायुतीचे सरकार सत्तेत आहे आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली पण कर्जमाफी देताना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन केवळ दोन लाखांपर्यंतचीच कर्जमाफी जाहीर केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याचा निषेध करत अर्थसंकल्पाची होळीच करण्यात आली.
राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे निलंबन
सी सी टिव्ही यंत्रणेमुळे पुराव्यासह मास कॉपी चे प्रकार आले उघडकीस
बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील परीक्षा केंद्रावर सर्वाधिक १७ कर्मचाऱ्यांचे निलंबन
छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात २४ जणांवर गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यात ५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
गडचिरोली जिल्ह्यातील चॅट जी पी टी कॉपी प्रकरणात तीन शिक्षक आणि एका शिपाई वर गुन्हा दाखल असून चार ही जणांचे निलंबन
उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक तीन येथे 11 नंबर पॅनल मध्ये हत्या झाली. भर दिवसा कर्तव्यावर असताना हत्या झाली. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचा हा सफाई कामगार होता.
कोल्हापूर शहरालगत असलेल्या मनेरमळा परिसरात एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनेरमळा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर मारहाणीचे चिन्ह असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.. खून नेमका कशामुळे झाला याचाही पोलिसांकडून तपास सुरू झालाय..
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात एका घराला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. घराच्या तिसऱ्या मजल्यावर मंडपासाठी लागणारे कपडे आणि डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठा भडका घेतला आणि आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे तसेच यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री कानिफनाथ यात्रा उत्सवावर वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्यानंतर घालण्यात आलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे.. त्यामुळे गुहा येथे हजारो हिंदू भाविकांनी मोठी गर्दी केली असून पारंपरिक यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे.. भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.. पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..
हिंदू - मुस्लिम गटांच्या दाव्या प्रतिदाव्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील श्री कानिफनाथ महाराज यात्रौत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे... कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि वक्फ बोर्ड यांच्यातील वाद न्यायालयीन प्रविष्ठ असल्याने या यात्रोत्सवाकडे अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले होते.. उच्च न्यायालयाने यात्रोत्सवावर असलेली बंदी उठवल्याने हिंदू बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण.. न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, अक्षय कर्डिले आदींसह ग्रामस्थांनी कानिफनाथी महाराजांची महाआरती करत यात्रोत्सवात सहभाग घेतलाय..
बातमीय बीड मधून सध्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून या परीक्षांमध्ये थेट शिक्षकच उत्तर पत्रिका तयार करून त्याचे झेरॉक्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे हा धक्कादायक प्रकार घडला आहे बीडच्या शिरूर तालुक्यातील रायमोह येथील जालंदर विद्यालयातील थेट विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आला असून शिक्षकच कॉपी साठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात बोर्डाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक सेंटर वरती सीसीटीव्ही बसवले मात्र सीसीटीव्ही ही काही काळासाठी बंद केले जात आहेत या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे
वाशिमच्या केकतउमरा गावच्या शेत शिवारात आग लागून उभा गव्हाची राख रांगोळी झाल्याची घटना समोर आली आहे, महावितरणची तार शेतातून गेली आहेत.. याचं तारांमध्ये घर्षणातू आग लागली आणि या आगीत कापणीला आलेला दोन एकर गहू खात झाला... हाता तोंडाशी आलेला घास महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे.. पांडुरंग ढोरे असं नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, अवघ्या काही दिवसांवर गहू पीक काढणीला येणार होत...मात्र,त्या पूर्वी आगीमुळे गहू पिकाची राख रांगोळी झाली असून झालेली नुकसान भरपाई शासनाने मदत स्वरूपात द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत..
कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर भूमाफिया आणि बिल्डरांनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. तक्रारदार नागरिकांनी थेट म्हैस घेऊन केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयात धडक देत प्रशासनाला निवेदन दिले.
या वेळी आंदोलकांनी म्हैस कार्यालयाबाहेर उभी करून निषेध व्यक्त केला. द्वारली पाडा परिसरातील गुरचरण जमिनीवर पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमाफिया आणि बिल्डरांनी सुमारे ७० ते ८० अनधिकृत चाळी उभारल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या अतिक्रमणामुळे गुरे चारण्यासाठी असलेली मोकळी जागा पूर्णपणे नष्ट झाल्याचेही नागरिकांनी सांगितले.
सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा तिढा कायम असताना,राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्य नोंदणी मध्ये जिल्हा प्रशासनाकडुन त्रुटी काढण्यात येत असल्याने आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सगळ्याच नेत्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत,सदस्य नोंदणी बजावण्याचा अधिकार गटनेत्या राजेश्वरी नाईक यांना देण्यात आला आहे, तसेच जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात येणाऱ्या त्रुटीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी प्रशासनावर दबाव होता का ? असा सवाल देखील उपस्थित केले आहे,तर आम्ही सगळे मुरलेले पैलवान आहोत,आमचा परस्पर बाजार करावे एवढे आम्ही वेडी माणस नाहीत,अश्या शब्दात संजय काका पाटलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटलांवर देखील टीका केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा हे लवकरच ठरवलं जाईल पण जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा व्हावा,अशी आमची मागणी असल्याचे देखील संजय काका पाटलांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
इराण,अमेरिका,इस्रायल यांच्यात होत असलेल्या युध्दा मुळे भारतात आखाती देशातून येणाऱ्या गॅस वर त्याचा परिणाम झाल्याने घरगुती सिलेंडर च्या भावात वाढ झाली आहे तर कमर्शियल गॅस सिलेंडर वर परिणाम झाला असला तरी मनमाड येथील पानेवाडी टर्मिनल येथील गॅस बॉटलींग प्लांट मधून रोज अनेक जिल्ह्यात नियमित सिलेंडर पुरवठा सुरळीत सुरू आहे,सध्या घरगुती गॅस च्या किमतीत वाढ झाली असली तरी परिस्थिती गंभीर झाल्यास त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक वाढली आहे. हळदीला चांगला भाव मिळत आहे. हळदीला प्रतिक्विंटल 14 ते 15 हजार रुपये भाव मिळत आहे.हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सध्या समाधानी आहे.
अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीत सिंग याची चौकशी करू नका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
व्ही. के. सिंग यांची कामचलाऊ चौकशी सुरू असल्याचा देखील शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप
ते पायलटवर अपघाताची जबाबदारी ढकलून मोकळे होतील आणि त्यातून ते सहसलामत बाहेर पडतील
सी आय डी ने व्ही. के. सिंग यांची चौकशी करू नये
शांततेच्या मार्गाचा टप्पा संपला आहे, आता जर सरकारने दखल घेतली नाही तर काहीही होऊ शकत; बच्चू कडू यांचा सरकला इशारा
हजारो आदिवासी घेऊन बच्चू कडू चिखलदऱ्याच्या दिशेने रवाना
यवतमाळ जिल्ह्यात सहा ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला त्या अनुषंगाने आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड मार्फत खरेदीला प्रारंभ करण्यात आला असून यावेळी सभापती अनिल आडे ह्यांच्या हस्ते काटा पुजन करून हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन हरभरा खरेदीला सुरूवात करण्यात आली.हरभरा नाफेड मध्ये आठ हजार रूपये क्विंटल दराने खरेदी सुरू आहे.
रामकुंड परिसरात रंगपंचमी दरम्यान मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाल्याची संतापजनक दृश्य समोर आली आहेत. स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत काही हुल्लडबाजांनी चपला बूट आणि कपडे फेकले. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न करत असताना अशा प्रकारांमुळे गोदाप्रेमी आणि नाशिककरांमध्ये नाराजी व्यक्त होतेय. रामकुंड परिसरात रंगपंचमीदरम्यान झालेल्या हुल्लडबाजीप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी होतेय
कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती?
कोल्हापुरातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता
महेश पिळणकर यांचं झालं तरी काय ?
पिळणकर कुटुंबीयांचा सवाल
महेश पिळणकर प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज संविधान हक्क संघर्ष समिती कडून निदर्शन
कोल्हापूर मधील दसरा चौकात होत असलेल्या या आंदोलनात बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या पत्नी सह कुटुंबीय उपस्थित
खेड शिवापूर भागात गो रक्षकांकडून तरूणास अमानुष मारहाण
म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायवरला पकडून केली मारहाण...
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मारहाणीदरम्यान तरूणाला शेण खाऊ घातलं
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
काँग्रेसने आज हिंगोली मध्ये शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारीच्या विरोधात पदयात्रा काढली आहे कळमनुरी ते हिंगोली असा 18 किलोमीटरचा प्रवास करत ही पदयात्रा सायंकाळी हिंगोली शहरात दाखल होणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , सचिन नाईक,मोहन जोशी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत दरम्यान कळमनुरी शहरातून निघालेल्या या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने तरुण देखील सहभागी झाले आहेत
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपावर केलेल्या टिकेवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला टोला लगावाल आहे.11 जिल्हा परिषद सदस्यांवर काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळवता आला,तर मग त्यांचा विजय झाला,असं म्हणता येईल,अशा शब्दात मंत्री
पाटील यांनी विशाल पाटलांना टोला लगावलाय. खासदार विशाल पाटलांकडून भाजपवर टीका करताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचा जनतेने पराभव केला आहे,त्यामुळे भाजपाने आता पराभवाची सवय लावावी,अशी टीका विशाल पाटलांकडून करण्यात आली होती,यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे प्रत्युत्तर दिला आहे,ते सांगलीत बोलत होते.
जालन्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी तब्बल 25 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भोकरदन च्या प्रभात मतदारसंघातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी हा 25 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांनी या रस्त्याच्या मागणीचे पत्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिलं होतं आणि या कामाला या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजुरी मिळाली आहे.
राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्य सरकारकडून मार्च ते मे या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत आहे . याची माहिती तालुक्यातील गावागावात पोहोचावि म्हणून शहापूर तहसीलदार यांच्या मार्फत जनजागृती करण्यासाठी गावागावात व आदिवासी पाड्यात जाऊन घोगडी बैठक सुरू करण्यात आली आहे यात शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे कस्या पद्धतीने लाभ घ्यावा याची माहिती दिली जात आहे.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने शेती सिंचनासाठी दिला जाणारा पाणी उपसा सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा आणि गहू पिकांवर संकट निर्माण झाले आहे. प्रकल्प परिसरातील वीज पुरवठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा करता येत नाही. परिणामी बोराळा, ढोरखेडा, ताकतोडा, वाघी, खंडाळा आणि शेलगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. वाढत्या उन्हामुळे विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही कमी होत असून शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे शहरातील महानगरपालिकेच्या गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार
भारत सरकारच्या अधिपत्याखालील पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशभरात उपलब्ध असलेल्या प्रोपेन व ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
गॅस उपलब्धतेमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आहेत.नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत दाहिनी व APC (Air Pollution Control) प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत
वैकुंठ स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद राहतील.त्याऐवजी नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या कार्यरत ठेवण्यात येणार आहेत,
अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत देण्यात आली आहे.
पुणे महापालिका आयुक्तांनी काढले आदेश
लातूर जिल्ह्यात दहा पंचायत समिती असून आज दुपारी या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यातील लातूर आणि जळकोट पंचायत समितीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याने या ठिकाणी काँग्रेसचा सभापती होणार आहे. तर औसा ,निलंगा आणि देवणी या पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाल्याने भाजपाचा सभापती होणार आहे. चाकूर उदगीर आणि अहमदपूरचे सूत्र हे राष्ट्रवादीकडे असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, मात्र रेनापुर आणि शिरूर आंतपाळ या ठिकाणी सर्वांचे लक्ष लागले आहे. रेनापुर पंचायत समितीवर मनसेचा सभापती निश्चित आहे मात्र मनसे आणि भाजप एकत्र येणार की, मनसे काँग्रेस सोबत सत्तेत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.
राज ठाकरेंच्या मनसेचा आज वर्धापन दिन
रायगडाच्या पायथ्याशी होणार वर्धापन दिन
राज ठाकरेंसह कार्यकर्ते रायगडावर दाखळ
मेळघाटातील आदिवासीच्या प्रश्नावर बच्चू कडू आज आक्रमक होणार..
मेळघाटातील चिखलदरा तहसील कार्यालयावर आज दुपारी बच्चू कडूचे तांडव आंदोलन.
गेल्या 8 दिवसापासून मेळघाटातील अनेक भागात मेळघाटच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी काढली पदयात्रा..
बच्चू कडूच्या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणा मात्र सतर्क..
मार्चमध्ये पहिल्याच आठवड्यात पुणे तापलं...
लोहगाव,कोरेगाव पार्क परिसरात तापमान 39 अंशावर
यंदाच्या मार्चमधील सर्वाधिक तापमानाची नोंद
दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
बारा ते चार काम असल्यास बाहेर पडा आणि उन्हापासून काळजी घ्या, हवामान खात्याच आवाहन
कोणत्या परिसरात किती तापमान
कोरेगाव पार्क 39 अंश
लोहगाव 39 अंश
शिवाजीनगर 37 अंश
पाषाण 37 अंश
लवळे 37 अंश
मगरपट्टा 36 अंश
एनडीए 36 अंश
पुणे महापालिकेच्या आज अर्थ संकल्प होणार सादर
महापालिका आयुक्त नवल किशोर राम करणार अर्थसंकल्प सादर
कोणत्या नवीन प्रकल्पांना तरतूद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष
कोणत्या नवीन योजनांचा समावेश होणार याकडे सगळ्यांचं लक्ष
आज आयुक्त करणार अर्थसंकल्प सादर
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी नाराजी टाळण्याचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रयत्न
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मागवले इच्छुकांचे अर्ज
पहिल्यांदाच इच्छुकांचे अर्ज मागावण्यात आले आहेत
सुनेत्रा पवार या आता अर्जावर निर्णय घेणार आहेत
१८ मार्च ला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत
गेल्या आठवड्यात पक्षाच्या बैठकीत सर्वाधिकार हे सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत
वीरधवल जगदाळे,विवेक वळसे पाटील, अंकिता पाटील ठाकरे,शांताराम इंगोले इच्छुक
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची नोंदणी करण्यात आली आहे
रत्नागिरीत सध्या धुक्याची चादर पहायला मिळतेय.या पडलेल्या धुक्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतेय.त्यामुळे वाहनांचा वेग देखील मंदावलाय.रात्री गर्मी ,दिवसा कडकडीत उन आणि पहाटे गारवा असं वातावरण सध्या रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळतय.या दाट धुक्यामुळे कोकणच्या सौंदर्यात आणखी
भारताच्या टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीच्या मिरजेमध्ये जल्लोषादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार करण्यात आला. मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये जल्लोष करण्यासाठी नागरिक जमले होते. यावेळी जल्लोषा दरम्यान काही जणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी लाठीमार करून हुल्लडबाजी करणाऱ्यांना पिटाळून लावले. जल्लोष करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती. परंतु काही जणांच्या हुल्लबाजीमुळे गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीमार करावयास लागला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हिरकणी वाडी येथे काही वेळात साजरा होणार आहे. त्याकरीत हिरकणी वाडी येथे भव्य असा सभा मंडप उभारण्यात आला आहे. राज ठाकरे आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत प्रथम किल्ले रायगडावर जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन नंतर ते हिरकणी वाडी येथे सभास्थानी आपला प्राथमिक सदस्य नोंदणीचा फॉर्म भरणार आहेत. त्या नंतर हि सदस्य नोंदणी महाराष्ट्र भर सुरु होणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये काही काळ वास्तव्यास असलेल्या मुलीने दुबई सोडताना कृतज्ञतेचा भावनिक संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारतात परतताना दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिने तेथील अधिकाऱ्यांप्रती आभार व्यक्त केले.
तनिष्का वीर असे या मुलीचे नाव असून कात्रजमधील वंडर सिटी सोसायटी येथे तिचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत.ती काही काळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत होती.
भारतात परतण्यापूर्वी तिने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक फलक हातात धरून मानवतावादी संदेश लिहिला.
पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी आज मतदान होणार
१३ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ९० जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजपचे २८ सदस्य विजयी झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १२, शिवसेना (शिंदे गट)१०,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४ तर दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत.
आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे.त्यामुळे या ठिकाणी सभापती व उपसभापती पदांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. मात्र जुन्नर, खेड, दौंड आणि भोर येथे चित्र तुलनेने रंगतदार आहे. जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसही मजबूत स्थितीत आहे.
भोरमध्ये राष्ट्रवादी व भाजपचे समसमान सदस्य असल्याने तेथे राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत.
सीसीआयने कापूस विक्रीसाठी 15 मार्च पर्यंत मुद्दत वाढ दिली मात्र या मुद्दत वाढीत नवीन शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नोंदणी करता येत नाहीये असेच सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आले आहे. आता केवळ यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना स्लाॅट बुकिंग करता येत आहे. त्यातही हजारो शेतकरी नोंदणी प्रक्रियेच्या बाहेर राहिले आहे.स्लाॅट बुकिंग च्या तारखा संपल्या असून त्यामुळे मुदत वाढविल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना कापसाची विक्री करता आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.