- ‘सिडको आणि सातपूर वॉलमन’ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट
- खरात प्रकरणातील एकूण ८ अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे उघड
बुलढाणा जिल्ह्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेवरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण 166 पेट्रोल पंप असताना, त्यापैकी अनेक पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे, त्या पेट्रोल पंपांवर तब्बल 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनचालक सकाळपासूनच रांगेत उभे राहत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडत आहे. दरम्यान, इंधन तुटवड्याबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात सध्या काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडू शकतो. ३० मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३१ मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवून काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठेवावीत व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढलेल्या उकाड्यानंतर महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाबळेश्वर थंडगार झाले, मात्र या अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सायंकाळी सुमारे एक तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, तर अचानक बदललेल्या वातावरणामुळे परिसरात गारवा पसरला.
सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹२०० ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या. पेट्रोल खरेदीवर ₹२०० अशी स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही.
भंडाऱ्याची उधळण व येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मनमाडच्या बुरकुलवाडी येथे रामनवमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बारा गाड्या ओढण्यात आल्या.यानिमित्त भरलेल्या यात्रेला पंचक्रोषीतील भाविकांनी गर्दी केली होती. दरवर्षी मनमाडच्या बुरकुलवाडी येथील खंडेराव महाराज नवसाच्या नवरदेवाने बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. नवरदेवला हळद लावण्यात येते दररोज खंडेराव महाराज मंदिरात आरती व जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरु असतो. नवसाच्या नवरदेवाला वराप्रमाणे मंडोळ्या व् बाशिंग बांधून सजविन्यात येते .गावातून मिरवणुक काढून सायंकाळी बारा गाड्या ओढल्या जातात पंचक्रोशितील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. बारा गाड्या ओढताच भंडाऱ्याची उधळण व येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला डफ व संबळ या पारंपारिक वाद्यावर मानाचा घोड़ा व काठी नाचाविण्यात आली.
आम्ही स्पष्टपणे कळवू इच्छितो की तेल कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सध्या पूर्णपणे सुरळीत सुरू आहे.
पुणे आणि आसपासच्या भागात इंधनाची कोणतीही कमतरता नाही. सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधन उपलब्ध करून दिले जात आहे आणि पुरवठा साखळी व्यवस्थित कार्यरत आहे.
मात्र, सध्या घाबरून इंधन खरेदी करण्याच्या प्रवृत्तीमुळे मागणीत अनावश्यक वाढ होत आहे.
या अचानक वाढलेल्या मागणीमुळे वितरण व्यवस्थेवर ताण येत असून, नागरिकांना तात्पुरती गैरसोय होऊ शकते.म्हणूनच आम्ही सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की:
* अनावश्यक साठा करू नये
* केवळ नेहमीच्या गरजेनुसारच इंधन खरेदी करावे
* पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी सहकार्य करावे आणि शिस्त पाळावी
आपले सहकार्य सर्वांसाठी इंधनाची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यास आणि शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत करेल.
असोसिएशन तेल कंपन्या आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे, जेणेकरून पुरवठा अखंड राहील..
पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे आवहान...
आज श्रीराम जन्मोत्सवानिमित्त गडचिरोली जिल्यातील अनेक ठिकाणी श्री राम जनमोस्तव साजरा करण्यात येत आहे त्या निमित्य श्रीराम मंदिर आष्टी येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त आष्टी येथील राम मंदिरा मध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान जी यांची वेशभूषा साकारलेले बालगोपाल व रॅली काढून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून फिलेरियासिसचा पूर्णतः नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन एक्सप्रेस' (ट्रेन क्रमांक 12123/12124) चा 'रेल्वे महोत्सव' साजरा करणार असल्याची अभिमानाने घोषणा करत आहे.
अमरावती शहरातील देखील अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणाऱ्या ॲम्बुलन्सला देखील बसला फटका
अनेक पेट्रोल पंप बाहेर पेट्रोल बंदचे लाभले बोर्ड
गेल्या दोन दिवसापासून अमरावती शहरात पेट्रोलचा तुटवडा असल्याने सामान नागरिकांना होत आहे त्रास
आम्हाला पेट्रोल केव्हा सुरळीत मिळणार नागरिकांनि केले प्रश्न उपस्थित..
1913 मध्ये तात्कालीन बडोदा संस्थानाचे मराठमोळे शासक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत असलेली नॅरो गेज रेल्वे अजूनही सुरू ठेवण्यात आलेली आहे. पश्चिम रेल्वे द्वारे चालवणारी १०० वर्ष हून अधिक जुनी नॅरो गेज रेल्वे गुजरात मधील वलसाड भागात महत्त्वाची जीवनवाहिनी आज ही ठरत आहे.बिलीमोरा ते वघई हा रेल्वेमार्ग ६३ किलोमीटर लांबीचा असून हा प्रवाससं सुमारे तीन तास हून अधिक कालावधी लागत असून या मिर्गिकेवर एकही सिग्नल यंत्रणा याची कधीच गरज भासली नाही कारण या एक मार्गिकेवर एकच नॅरो गेज रेल्वे धावत असून याच रेल्वे च्य दिवसभरातून चारच फेऱ्या होत असतं महत्वाचे म्हणजे या लोकल नॅरो गेज रेल्वे च्या मार्गिकावर असलेले ६५ फाटक या फटका पैकी काही फाटक हे स्वतः ट्रेन थांबवून रेल्वे कर्मचारी हे फाटक बंद करून ट्रेन फटाक्याच्या पुढे घेऊन परत स्वतः फाटक हे रहदारीसाठी उघडा करून देत अशी आधुनिक युगातील पद्धत ही या ठिकाणी वलसाड येथे पाहायला मिळा
अमरावती शहरातील देखील अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणाऱ्या ॲम्बुलन्सला देखील बसला फटका
अनेक पेट्रोल पंप बाहेर पेट्रोल बंदचे लाभले बोर्ड
गेल्या दोन दिवसापासून अमरावती शहरात पेट्रोलचा तुटवडा असल्याने सामान नागरिकांना होत आहे त्रास
आम्हाला पेट्रोल केव्हा सुरळीत मिळणार नागरिकांनि केले प्रश्न उपस्थित..
शेतकऱ्याची सात एकर डाळिंब बाग उध्वस्त...
रात्रभर झालेल्या पावसाने डाळिंबागेचे लाखो रुपयांचे नुकसान
14 तास झाले तरीही गारांचे खडे विरघळले नाहीत, तुफान गारपिटीमुळे डाळिंब तुटून पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
- मंत्री नरहरी झिरवाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध...
- राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात नाशिकमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या युवसेनेकडून निषेध आंदोलन केले आहे. भोंदू अशोक खरातवर कठोर कारवाई व्हावी आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी ठाकरेंच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. अशोक खरातने केलेलं कृत्य तसेच अघोरी पूजाविधी यांचे प्रतिकात्मक स्वरूपात आंदोलन करत मंत्री नरहरी झिरवाळ यांचा पुतळा जाळत आंदोलन करण्यात आलं.
आगीचे कारण स्पष्ट नाही
मात्र आग मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
आजुबाजूला इमारती असल्याने आग पसरण्याची भीती
आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू
कुणाला दुखापत झाल्याने वृत्त नाही,मात्र लाकडी बांबू असल्याने संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी
समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा आधार घेत काढण्यात आलेले हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या नव्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात उघड्यावर म्हणजे कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
केडीएमसी हद्दीतील बेकायदा होर्डिंग मोजण्यासाठी २० लाख रुपये?
प्रशासकीय राजवटीतील अजब प्रकार
उधळपट्टी की भ्रष्टाचार? शिंदे सेनेच्या नगरसेवकाचा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही प्रमुख उपस्थिती रथ पूजन आणि आरती सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडेल नंतर रथ ओढला जाईल
बदलापुरातील 100 टक्के टीबी रुग्णांना दत्तक घेत त्यांची सेवा केल्याबद्दल नगरसेवक आणि आरोग्य सभापती किरण भोईर यांना महाराष्ट्र शासनाकडून चौथ्यांदा निक्षय मित्र पुरस्कार देण्यात आलाय. टीबीसारख्या घातक संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी किरण भोईर गेल्या सात वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी बदलापूर शहरातील 100 टक्के क्षयरोग रुग्णांना दत्तक घेतलय. तसच आतापर्यंत 700 हून अधिक रुग्णांना दर महिन्याला मोफत पोषण आहार आणि वैद्यकीय सेवा देण्याचं काम ते करत आहेत. यापूर्वी राज्यपालांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आलं होतं. यानंतर सलग तीन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय.
सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले
गारपिटीमुळे मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरातील फळबागांना बसला फटका
पापरी परिसरात झालेल्या गारपिटीने द्राक्षबागा झाल्या उध्वस्त तर बेदाणा उत्पादनाला ही बसला फटका
रात्रभर झालेल्या गारपिटीचे बर्फ अजून ही वितळले नसल्याचे दिसून येत आहे.
या नुकसानग्रस्त शेतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी..
महाराष्ट्राची आराध्यदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात 23 वा स्थापना दिवस आज मोठ्या उत्साहात मनमाडमध्ये साजरा करण्यात आला. 23 वर्षांपूर्वी मनमाड शहरातील आय यु डीपी येथील पंधरकर परिवाराने रामनवमीच्या दिवशी मंदिराची स्थापना करत देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. तेव्हापासून दर रामवमीच्या दिवशी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होत असते. याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाविकां साठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
फॉरेन्सिक टीमने खरातच्या कार्यालयात बोटांचे ठसे घेतल्याची माहिती
खरातचा कार्यालयातील टेबल आणि अन्य साहित्यावरील हातांचे ठसे घेतल्याची माहिती
राज्याची 'हॉट सिटी' म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात उन्हाळा कसा असेल, याची झलक दिसू आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी 30 अंशाजवळ असलेले तापमान आता शेवटी 40 अंशापर्यंत पोचले आहे.
जय भारत शाळेतील धक्कादायक प्रकार
शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला पाठवला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ
मनसे कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ
ट्रस्टच्या मुलाला आमच्या ताब्यात द्या,मनसेची मागणी
मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरूच
भोंदू बाबा अशोक खरातच्या कार्यालयात एसआयटीचे पथक दाखल
फॉरेन्सिक टीम सह एसआयटीचा पथक अशोक खरातच्या कार्यालयात करत आहे तपासणी
अशोक खराच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती
अशोक खरात वर नाशिक मध्ये दाखल करण्यात आले आहे आठ गुन्हे
लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अशोक खरात आहे नाशिक पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर येथील जोतिबा मंदिरात भक्त आणि पुजाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा मुद्दा आणखी तापला
प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
सुरक्षा रक्षक, देवस्थान समिती कर्मचारी आणि ड्युटीवरील पोलिसांच्या भूमिकेवर व्यक्त केला प्रश्नचिन्ह
सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी
यात्रा काळात शांतता राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती
मारहाण करणाऱ्या संबंधित पुजाऱ्यांना यात्रा काळात मंदिरापासून दूर ठेवण्याचीही मागणी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
रामनवमी निमित्ताने विठ्ठल सभामंडपामध्ये कीर्तन आयोजन करण्यात आले होते यावेळी राम जन्माचा पाळणा म्हणून सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करून देवाच्या अंगावर गुलाल टाकण्यात आला या जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित होते.
पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडताना महापालिका आयुक्त यांनी नियमबाह्य पद्धतीने निवड केल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे भाजपच्या सात पैकी दोन अर्ज बाद झाल्यानंतर ही त्यांना पुन्हा मुदत देऊन अर्ज दाखल करुन घेणे हे घटनाबाह्य असल्याचं म्हणत मनसेने या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र देऊन रद्द करावं मागणी केली आहे. आयुक्तांमी आराजकीय व्यक्तींना संधी का दिली नाही असा सवाल केलाय. याबाबत आयुक्तांनी खुलासा केला नाही तर कोर्टात खेचणार…याबाबत आयुक्तांना कल्पना दिली पाच दिवसात मनसेने खुलासा मागितला आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा संपन्न
काळाराम मंदिरात दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव सोहळा साजरा
रामजन्मोत्सवानंतर काळाराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्राच्या नावाच जयघोष
राम जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
काळाराम मंदिरात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी
खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे भगवान शिव व माता पार्वती यांचा विवाह सोहळा पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला.
आकर्षक विद्युत रोषणाईने सजलेल्या शिव मंदिरात हा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला
पुरोहितांच्या मंत्रोच्चारात आणि मंगलाष्टकांच्या स्वरात विवाह विधी पार पडताच ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
दुचाकी फक्त दोनशे रुपयांचे पेट्रोल भरता येणार
चार चाकी मध्ये केवळ दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार
हिंगोली चे पुरवठा अधिकारी यांनी काढले आदेश
नागरिक अफवा पसरत असल्याने पेट्रोल पंपावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने गाईडलाईन्स केल्या जारी
विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी मंदिर समितीने उभारलेला कापडी मंडळ वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे.
रात्री पंढरपूर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
या वेळी कापडी मंडप कोसळून रस्त्यावर पडला आहे, यामुळे भाविकांची गैरसोय निर्माण झाली आहे.
पुण्यात उन्हाचा कडाका वाढला
उन्हाच्या झळा प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना देखील
पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उन्हापासून बचावासाठी प्राण्यांसाठी विशेष काळजी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढणार असल्याच्या भीतीने पालघर मधील पेट्रोल पंप बाहेर वाहन चालकांची मोठी गर्दी.
पालघर बोईसर डहाणूसह परिसरात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा.
पेट्रोल पंपांवरी पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला.
वाहन चालकांची पेट्रोल पंप बाहेर गर्दी मात्र कायम .
आज दुपारनंतर इंधनाचा पुरवठा करणारी वाहन पेट्रोल पंपांवर पोहोचणार असल्याची काही पेट्रोल पंप चालकांची माहिती.
यवतमाळ-
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर पसरला सन्नाटा
शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरील साठा संपला
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
जालना -
जालन्यातील पेट्रोल पंपावर तुफान गर्दी, पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचे वाटप
जालना जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉक चे बोर्ड तर ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध त्या ठिकाणी नागरिकांची इंधनासाठी गर्दी.
जालन्यातील मंठा रोडवरील चौधरी नगर येथील पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्तात पेट्रोल वाटप सुरू...
कोल्हापूर -
कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडर साठी पुन्हा नागरिकांनी गॅस वितरण केंद्रासमोर केली गर्दी
गॅस टाक्या घेऊन डिलिव्हरी बॉय येत नसल्याने नागरिक संतप्त
पाडव्यानंतर राम नवमीच्या दिवशी देखील नागरिक गॅस वितरण केंद्राच्या दारात
सकाळी सात वाजल्यापासून अनेक नागरिक गॅस वितरण केंद्राच्या दारात
नाशिक -
- भोंदू बाबा अशोक खरातच्या शिवनिका संस्थांनचे बँक अकाऊंट सील, आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू
- विशेष तपास पथकाने मालमत्तेची माहिती मागवली
- कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी
- नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू
- कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता
- मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला? याचा तपास बेनामी मालमत्ता असल्याचा संशय
- पुढील 2–3 दिवसांत तपासाला आणखी वेग येणार
सोलापूर -
सोलापूर शहरातील प्राईम फ्युएल ऑटो एलपीजी पंप करण्यात आला बंद
एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याने सोलापूर शहरातील नई जिंदगी भागातील पंप करण्यात आला आहे बंद
मागील जवळपास 15 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप आहे बंद
शहरातील महत्वाचा एलपीजी पंप बंद असल्याने ऑटो रिक्षा चालकांचे होतायत हाल ; गॅस तुटवाड्याचा रिक्षा चालकांना फटका
एलपीजी पंपावरील काम करणाऱ्या जळवपास 8 ते 10 कर्मचाऱ्यांवर आलीय बेरोजगाराची वेळ
रायगड -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आपल्या पदाचा त़डकाफडकी राजिनामा दिला आहे.
यानंतर आता होमी भाभा सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
राज्यपालांच्या आदेशावरून कुलगुरू काळे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते मात्र त्यामागचे कारण स्पष्ट झालेलं नाही.
जळगाव -
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतराण गावात पार पडली भव्य बैलगाडा शर्यत
प्रगतशील शेतकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भागवत पाटील यांच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन..
शर्यतीत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यासह राज्यभरातील 300 हून अधिक बैलगाडा स्पर्धक शेतकरी सहभागी....
नाशिक -
- नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह
- रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
- आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळला
- मंदिर गाभाऱ्यातही फुलांची आकर्षक सजावट
- रामनवमीच्या निमित्ताने आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, तर भाविकांचीही दर्शनासाठी मोठी गर्दी
नागपूर -
- शहरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर आणि रामनगरातून भव्य शोभायात्रा निघणार.
- शहरात साडेतीन हजारांहून अधिक पोलीस आणि होमगार्ड तैनात.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, होणार सहभागी...
- सुरक्षा पथकात २०० अधिकारी, २००० पोलीस अंमलदार, १,४०० होमगार्ड जवान राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी सज्ज.
- संपूर्ण मार्गावर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार.
- गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरासह ड्रोनच्या सहाय्याने आकाशातूनही पाळत ठेवली जाणार.
- संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश
- मिरवणूक संपेपर्यंत सर्व यंत्रणा घटनास्थळी तैनात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
कोल्हापूर -
"मराठेशाहीचा इतिहासकार हरपला"
महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार
यांचे निधन
आज पहाटे त्यांचे झाले दुःखद निधन झाले.
निधनासमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते
गेल्या अनेक दिवस एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर सुरू होते उपचार
पुणे -
शहरातील बांधकामाच्या वेळेवर निर्बंध सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत वेळ निश्चित
रात्री सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय
रात्री होणाऱ्या बांधकामामुळे आणि धुळीमुळे दोन्ही प्रदूषण आणि वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आल्याने निर्णय
सकाळी लवकर आणि रात्री उशिरा होणाऱ्या बांधकामामुळे हवा दोन्ही प्रदूषणात अधिक वाढ होत आहे
महापालिकेच्या बांधकाम विभागाने वेळेचे निर्बंध लागू केले आहेत त्यामुळे आता बांधकाम सकाळी लवकर आणि रात्री उशिरा करता येणार नाही
पुणे -
आरटीओचा भोंगळ कारभार समोर ई वाहनधारकांना कर भरण्याच्या नोटीस
एसएमएस द्वारे चकित मोटार वाहन कर भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत
राज्य सरकारच्या धोरणानुसार ई वाहनांना 2030 पर्यंत करातून पूर्ण माफी असतं नाही नोटीसा पाठवल्याने संभ्रम
नोटीसा चुकून आल्याने ई वाहनधारकाने याकडे दुर्लक्ष करावे असं आवाहन चूक लक्षात आल्यानंतर आरटीओने केला आहे
गडचिरोली -
आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल टंचाई
गडचिरोली जिल्ह्यातील येनापुर येथील पेट्रोल पंपासमोर दोन किलोमीटरपर्यंत डिझेल भरण्यासाठी ट्रकची लागली रांगच
वाहतूक ठप्प झाल्यामुळे आष्टी पोलिसांनी येऊन वाहतूक केली सुरळीत
नांदेड -
नांदेड जिल्हात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा
नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये
अफवांवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.