Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: कफ परेडला जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद होईना, प्रवाशांचे हाल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक १८ डिसेंबर २०२५, राज्यात थंडी पुन्हा वाढली, जिल्हा परिषद-महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

कफ परेडला जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद होईना, प्रवाशांचे हाल

कफ परेडला जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद होईना, प्रवाशांचे हाल.

पुण्यात 25 ई डबल डेकर बस

पुण्यात 25 ई डबल डेकर बस

पुणे पीएमपी भाडेतत्त्वावर 25 इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेणार

पीएमपी प्रशासनाने बुधवारी 25 डबल डेकर बच्चे निविदा काढली आहे त्यानुसार नवीन वर्षात पुण्यातील रस्त्यावर डबल डेकर बस धावताना दिसणार

Nashik : नाशिकमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खमताने गावातील नाभिक समाजाच्या नववर्षाच्या अमानुष चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता या चिमुकलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नवापूर नाभिक समाजाच्या वतीने अत्याचार विरोधी मूक मोर्चा काढण्यात आला आहे.

Akola : धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल्यास आमरण उपोषण करू, खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धनंजय मुंडे यांना देण्याच्या चर्चा सुरू आहेत. असं झालं तर बीडमध्ये जाऊन आमरण उपोषण करू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी बोलत. सुप्रिया ताईंना उपोषणाची वेळ येऊ देणार नसल्याचं ते म्हणालेत.

Solapur : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बावी पाटीजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी , टेम्पो चालकाच्या डोक्याला मार ; इतर विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली

आरोग्य शिबिरासाठी धाराशिवकडे निघालेल्या निवासी मुकबधिर विद्यालय, उमरगा येथील ३५ विद्यार्थी, एक शिक्षक व चालक टेम्पोमध्ये प्रवास करत होते

Ahilyanagar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल..नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेला उपस्थिती.. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे उपस्थित.

Satara : बामणोली ड्रग्स प्रकरणावर सुषमा अंधारे यांच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर

बामणोली परिसरातील कथित ड्रग्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Mumbai : मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने संपूर्ण कोर्ट परिसर खाली करण्यात आला. माहिती मिळताच बॉम्ब निरोधक पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

Pune : काँग्रेस भवन मध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

काँग्रेसच्या कालपासून सुरू आहेत मुलाखती

भाजप नंतर काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी

काँग्रेस भवन बाहेर छावणीचे स्वरूप

महाविकास आघाडी मधून लढावी अशी राष्ट्रवादीची इच्छा असली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांची ही इच्छा महाविकास आघाडी म्हणूनच लढावं

Pune : पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पुणे पोलिसांकडून नाकेबंदी केली जात आहे. पोलिसांकडून गाड्यांची तपासणी केली जात आहे. पुण्यातील मंगळवार पेठ परिसरात फारच खाना पोलिसांकडून नाकेबंदी सुरू असून सर्व गाड्या तपासले जात आहेत.

Washim: वाशिम नगर परिषदेची निवडणूक मतमोजणी केंद्राच्या मंडप खर्चात वाढ...

वाशिम नगर परिषदेची निवडणूक २ डिसेंबरला पार पडणार होती. मात्र तक्रारींअंती निवडणूक आयोगाने या निवडणूक प्रक्रियेला ऐनवेळी स्थगिती देत ही निवडणूक पुढे ढकलली.त्यामुळे निवडणूक आयोगाच्या स्थगितीच्या निर्णयाचा थेट परिणाम प्रशासनाच्या खर्चावर झाला आहे, evm वाटप केंद्रावर व मोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली तयारी आधीच सुरू करण्यात आली होती. त्यानुसार मत मोजणी केंद्राच्या ठिकाणी 4 दिवसांसाठी उभारण्यात आलेला मंडप गेल्या जवळपास १९ दिवसांपासून उभा आहे.त्यामुळे मंडप आणि मनुष्यबळावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे

Nagpur: नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी

* नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचा मेल

* जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेलआयडी वर मेल आल्याची माहिती

* सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात सुरक्षेत वाढ

माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे आहेत कुठे ?

- नाशिक पोलीसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू

- विजय कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकेच्या स्थगितीसाठी अद्याप अर्ज दाखल न केल्याची सूत्रांची माहिती

- माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटेंविरोधात नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने बजावले आहे अटक वॉरंट

- माणिकराव कोकाटे रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांच्या अटकेची शक्यता कमी

Jalgaon: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे

आज चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे

चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचले आहे

गेल्या दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल 9 हजार रुपयांची वाढ झाली आहे

सोन्याच्या दारात आज 200 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे..

सोन्याचे दर जीएसटी 1 लाख 36 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने दोन लाख 6 हजारांचा आकडा पार केला आहे

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात राबवली जाणार अंगणवाडी बालकांची स्क्रिनिंगसाठीची विशेष मोहीम...

नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावरील बालकांचे आरोग्य भूषण आणि सेवा वितरण अधिक प्रभावी करण्याचा दृष्टीने विशेष आरोग्य तपासणी स्क्रीनिंग मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे याबाबत नुकताच झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील सूचना दिलेल्या आहेत, यासोबतच पोषण ट्रेकर अंगणवाडी केंद्राची सद्यस्थिती नवीन अंगणवाडी बांधकाम आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात येणार आहे...

Nashik: नाशिक महापालिकेसाठी आजपासून शिंदेंच्या शिवसेनेच्या मुलाखती

- नाशिक महापालिकेसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती

- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार मुलाखती

- आजपासून ३ दिवस घेण्यात येणार इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती

Sangameshwar: संगमेश्वर तुरळ येथे कार अपघातात चालकाचा मृत्यू....

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.रस्त्याच्या कडेला संरक्षक म्हणून बांधलेल्या गर्डरवर अपघातग्रस्त ब्रेझा गाडी आदळली आणि तशीच काही फूट पुढे गेल्याने तुटलेला गर्डर गाडीचे इंजिन फोडून मागच्या सीटपर्यंत गेला. त्यात तो चालकाच्या मांडीत घुसल्याने चालक गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि जागीच ठार झाला. सलीम सुलतान खान असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे.. तो वसई, मुंबई येथील आहे.. तर त्यांचा मित्र सुखविंदर संधू हा जखमी आहे..संधू याला उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. कार भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे..

Amravati: अमरावतीत इन्स्टावर शस्त्रासह फोटो व्हायरल करून दहशत पसरवणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात..

अमरावती शहरात सोशल मीडियावर शस्त्र दाखवून दहशत पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई समोर आली आहे. इंस्टाग्रामवर घातक शस्त्रासह फोटो अपलोड करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तरुणाला अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.गुप्त माहितीनुसार जेवड नगर परिसरात सापळा रचत पोलिसांनी अभिषेक उध्दव मेश्राम या २४ वर्षीय तरुणाला पकडले. त्याच्या झडतीत एक चायना चाकू जप्त करण्यात आला.या प्रकरणी आरोपीविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात आर्म्स अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Amol Mitakri: अजितदादा या राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष असेल तर राज्यातील नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी किंग मेकर असेल, अजित दादा लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असे विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. नांदेडच्या धर्माबाद येथे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अमोल मिटकरी यांनी हे विधान केलं आहे. दादा हे मुख्यमंत्री होतील त्याचं कारण दादांना राज्यातील लाडक्या बहिणीचा आशीर्वाद, लाडक्या भावांचा आशीर्वाद,शेतकऱ्यांचा आशीर्वाद,आहे. असे अमोल मिटकरी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

‘शिल्पकलेचा कोहिनूर' काळाच्या पडद्याआड- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि 'शिल्पकलेचा कोहिनूर' काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

Pune News: पुण्यात आज भाजप आणि शिवसेनेत बैठक

पुणे महापालिकेसाठी दोन्ही पक्ष येणार एकत्र

पुण्यातील सर्व प्रभागांची चाचपणी केली जाणार

पुणे महापालिकेसाठी भाजप सेना युती होणार

भाजपकडून आज चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मुख्य शहरातील पदाधिकारी उपस्थित राहणार

शिवसेनेकडून उदय सामंत, निलम गोऱ्हे, शहर प्रमुख नाना भानगिरे उपस्थित राहणार

दुपारी ३.३० वाजता होणार दोन्ही पक्षाची एकत्रित बैठक

उबाठा युवासेनेचे माजी विदर्भ सचिव बेलखेडे भाजपात

पूर्व विदर्भातील युवासेनेचे (ubt) माजी विदर्भ सचिव व गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने शिवसेनेला मोठा धक्का बसला. एक सुशिक्षित युवा चेहरा म्हणून नीलेश यांची ओळख आहे. तसेच बेलखेडे हे तेली समाजाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आहे. पूर्व विदर्भात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

Pimpri Chinchwad: शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे भाजपमध्ये प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. राहुल कलाटे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे... त्यांचा आज प्रवेश होणार असं बोललं जात आहे. मात्र आजच प्रवेश होणार का की त्यांना दुसरी वेळ दिली जाते याबाबत अजून अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही...!

Parbhani: परभणी शहराची वाट काँग्रेसने लावली, माजी महापौर प्रताप देशमुख याचा आरोप

परभणी महानगरपालिका निवडणूक लागल्यानंतर आता प्रमुख पक्षांत आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतं आहे परभणी शहराची वाट काँग्रेसने लावली आहे मागील 8 वर्षापासून त्याची सत्ता महापालिकेवर होती त्यांनी काही न करता शहराची वाट लावली आहे असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी महापौर प्रताप देशमुख यांनी केला आहे. काँग्रेसने कोणतेही कामे शहरात न केल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे .तर मागील 4 वर्षापासून महापालिकेत प्रशासक आहे आणि या प्रशासकाच्या काळात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी परभणी साठी कोणताही निधी दिला नाही त्यामुळे परभणीची ही अवस्था झाल्याचे काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्तीअंबीरे म्हणाले आहेत काँग्रेसच्या काळात अनेक कामे करण्यात आली मात्र प्रशासक आल्यापासून परभणीची वाट लागली असल्याचे कॉग्रेस नेते सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी म्हणले आहे तर येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केल आहे

Amravati: अमरावतीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विजय सुनील चौरागडे, जनता कॉलनी, अमरावती असं अटक आरोपीचे नाव आहे. विजय हा अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली होती. या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याच्या ताब्यातून 93 हजारांचा दारूचा मुद्देमाल जप्त करत त्याच्या विरोधाचा राजापेठ पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

वर्ध्याच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा

- वर्धेच्या देवळी येथे आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

- देवळी नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ आज दुपारी चार वाजता सभा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज देवळीत जनतेला करणार संबोधित

- देवळीत माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस व अन्य नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी सभा

- सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

- देवळीत भाजपा आणी काँग्रेस मध्ये आहे जोरदार लढत

- भाजपाकडून शोभा तडस, काँग्रेस कडून सुरेश वैद्य तर अपक्ष म्हणूंन किरण ठाकरे आहे रिंगणात

- मुख्यमंत्री यांच्या सभेची करण्यात आली जय्यत तयारी

Pune: पुणे महापलिकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

पालिकेने मूळ प्रभागात ९२ हजार मतदार आणले परत

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

प्रारूप मतदारयादीवर आलेल्या २२ हजार ८०० हरकती व प्रशासनाने स्वतःहून शोधल्या

शोधलेल्या ४५ हजार ४०० हरकतींवर काम करून महापालिकेने सुमारे ९२ हजार मतदार मूळ प्रभागात परत आणले

तीन लाख दुबार नावे असल्या ने विरोधी पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती

त्यानंतर महापालिकेने दुरुस्ती करून प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे.

'डीजीसीए’च्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळाचा घेतला आढावा

कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याचे प्रमाण वाढले आहे विशेषतः उत्तर भारतात धुक्याचा विमानसेवेवर मोठा परिणाम होत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळास भेट देऊन पाहणी केली.

धुके व कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत योग्य समन्वय साधून विमान उड्डाणे सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी टर्मिनल सुविधा, प्रवाशांना माहिती देण्याची व्यवस्था, विमान कंपन्यांचे काउंटर आणि ग्राउंड हॅण्डलिंग ऑपरेशन्सची तपासणी करण्यात आली. तसेच विमानतळ प्रशासन, सीआयएसएफ, विमान कंपन्या व ग्राउंड हॅण्डलिंग एजन्सींच्या प्रतिनिधींशी बैठकही घेण्यात आली.

Pune: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

41 प्रभागांतून 165 नगरसेवकांची निवडणूक

35 लाखांहून अधिक मतदारांसाठी 4,000 मतदान केंद्रांची तयारी

निवडणूक प्रक्रियेसाठी 23,500 अधिकारी-कर्मचारी तैनात

13,200 बॅलेट मशीन व 4,400 कंट्रोल युनिट्सचा वापर

Ratnagiri: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढलीय. सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. यापैकी एका गुराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. ही गुरे जंगलात चरण्यासाठी सोडलेली असताना बिबट्याने हल्ला केला. एकाच ठिकाणी चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी आणि मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिरजोळे सोनारवाडीतील गुरांवरील या हल्ल्यामुळे संपूर्ण मिरजोळे आणि लगतच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागलीय.

माणिकराव कोकाटे यांना आज अटक होण्याची शक्यता

- नाशिक न्यायालयाने काढलेलं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या अटकेचं वॉरंट काल संध्याकाळी नाशिक पोलिसांना प्राप्त

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आज करणार पुढील कारवाई

- नाशिक पोलिसांचं एक पथक आज मुंबईला जाण्याची शक्यता

- नाशिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय याचिका

- शुक्रवारी होणार आहे कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी

- सध्या कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात घेत आहेत उपचार

चौकशी न करता निलंबित केल्याने महसूल अधिकाऱ्यांमध्ये असंतोष

चौकशी न करता थेट निलंबित केले जात असल्याने महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

या कारवाईच्या विरोधात राज्यभरातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी येत्या १९ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात बुधवारी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी-कर्मचारी समन्वय महासंघाच्यावतीने बेमुदत कामबंद आंदोलनाची नोटीस मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव आशा पठाण यांच्याद्वारे सादर केली.

भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले

ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात हडपसरमधील फुरसुंगी भागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत मद्याच्या बाटल्यासह मोटार असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी वेदांत राहुल कामठे (वय १९), आकाश तुकाराम मुंडे (वय २४, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सुहास गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत कामठे हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल कामठे यांचा मुलगा आहे. गवळी हे निवडणूक आयोगाच्या पथकात नियुक्तीस आहेत. निवडणूक काळात या पथकाकडून आचारसंहिता पालन, तसेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. रात्री फुरसुंगी परिसरात तपासणी नाक्यावर गवळी नियुक्तीस होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून फुरसुंगीकडे भरधाव कार निघाली होती. ती कार तपासणीसाठी थांबवली असता त्यात मद्याच्या बाटल्या सापडल्या.

मद्याच्या बाटल्यांबाबत पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. तेव्हा दोघांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. बेकायदा मद्य वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको कोणताही अतिरेक नको आपल्याला पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला. भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर दोन अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची आज अंबरनाथ मध्ये जाहीर सभा होती, त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या विषयावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या निवडणूकित कोणावर टीका करायला आलो नाहीये मी तू तू मै मै करायला आलो नाही , ज्यांना तू तू मै मै करावे लागते त्यांना विकासाचा अजेंडा नसतो असेही फडणवीस पुढे म्हणाले या भाषणात विकासाच्या अनेक मुद्द्यांवर फडणवीस यांनी भाष्य केलं.

सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुटले

टाटा पॉवर प्रकल्प विरोधात अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू करण्यात आले होते. कर्जत नेरळ मधील स्थानिकांच्या न्यायहक्कासाठी उपोषणातून प्रकल्प अधिकाऱ्याना धारेवर धरण्यात आले.

आमरण उपोषणात प्रकल्प बाधितांच्या नागरिकांचे पुनर्वसन, ब्लास्टिंग मुळे घरांना जाणारे तडे, वृक्ष तोडीमुळे माकडांचा वाढणारा त्रास, नोकऱ्या, शेतजमिनींना योग्य भाव, स्थानिकांना या प्रकल्पातील कॉन्ट्रॅक्ट मिळणे, हॉस्पिटल,रस्ते,शेती साठी लागणारी पाईप लाइन,अशा विविध मागण्यासाठी उपोषण सुरूकरण्यात आले होते

मावळात आदिवासी कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर

मावळ तालुक्यातील आदिवासी कातकरी व ठाकर समाजासाठी हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे, या उद्देशाने एक ऐतिहासिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्य सरकारची भूमिका प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे अशी असून, त्यासाठी अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने चेकद्वारे आर्थिक मदत दिली जाते. मात्र मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कातकरी-ठाकर समाजाच्या बाबतीत ही योजना अपेक्षित परिणाम साधू शकलेली नाही. पहिला हप्ता मिळाल्यानंतर थोडेफार बांधकाम केले जाते, दुसरा हप्ता मिळाल्यावर आणखी काम होते; मात्र अपुऱ्या निधीमुळे, स्थलांतर, अज्ञान किंवा इतर अडचणींमुळे अनेक घरे अपूर्णच राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जीमला जाण्यापूर्वी प्रत्येकाने या मेडिकल टेस्ट करून घ्याव्यात, हार्ट अटॅकचा धोका टळेल

शिवसेना मनसेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोणत्या वार्डातून कोणाचा उमेदवार?

Watches Design: डेली ऑफिस वेअरसाठी हातात घाला 'हे' युनिक डिझाइनचे वॉच; प्रोफेशनल लूक दिसेल क्लासी!

भाजपचा डाव काँग्रेसच्या जिव्हारी, २ माजी आमदारांनी घेतलं कमळ, शेकडो समर्थकांनी सोडली साथ

KDMC elections: कल्याण-डोंबिवलीत राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार; २ नेत्यांच्या भेटीनं चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT