ajabrao lohare , bhandara , tumsar saam tv
महाराष्ट्र

Forest Department : लाचलुचपतच्या धसक्यानं वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या; कुटुंबाची पाेलीसांत धाव

या प्रकरणी तपास भंडारा पोलीस करीत आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara News : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (acb) चौकशीसाठी बोलाविल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहायकाने आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गायमुख जंगलात उघडकीस आली आहे. अजाबराव सीताराम लोहारे (परसोडी, ता. उमरेड, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे.

ते तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रांर्गत विटपूर बिटमध्ये क्षेत्र सहायक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी आंधळगाव ठाण्यात तक्रार देण्यात आली असून या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी अजाबराव लोहारे हे बुधवारी सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले. मात्र दुपारी त्यांचा मृतदेह गायमुख जंगातील खैराच्या झाडानजीक आढळून आला. दरम्यान भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 ऑगस्ट रोजी लेंडेझरी येथे लाच घेताना दोन वनरक्षकांसह चौघांना रंगेहाथ पकडले होते.

रेतीचा टॅक्टर सोडविण्यासाठी 15 हजारांची लाच घेताना कारवाई करण्यात आली होती. या कारवाई संदर्भात अजाबराव लोहारे यांना सोमवार 29 ऑगस्ट रोजी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलाविले होते. त्याचा धसका घेत त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा मनीष लोहारे याने आंधळगाव ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आता या प्रकरणी तपास भंडारा पोलीस करीत आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे वनविभागात (forest department) खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

SCROLL FOR NEXT