Ahmednagar ST Bus Car Accident Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

Ahmednagar ST Bus Car Accident : अहमदनगरमध्ये एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.

Satish Daud

अहदनगर जिल्ह्यातील जामखेड बटेवाडी शिवारास रविवारी रात्री एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

विजय गंगाधर गव्हाणे (वय २४) पंकज सुरेश तांबे (वय २४) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. अपघातात मयूर संतोष कोळी (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण खर्डा येथून कारने जामखेडच्या दिशेने येत होते.

त्याचवेळी राज्य परिवहन महामंडळाची बस जामखेड येथून खर्डा गावाच्या दिशेने येत होते. बटेवाडी शिवारात दोन्ही वाहने आली असता, कोल्हे पेट्रोल पंपाजवळ त्यांची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत बचावकार्य केलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

खाजगी रुग्णालयात प्राथामिक उपचार घेतल्यानंतर पाचही तरुणांना अहमदनगर येथील सिव्हिल रुग्णालयात रेफर करण्यात आलं. तिथे उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. अजूनही एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मराठीची कार्यशाळा, मराठी शिकवणाऱ्यावरून भाजप-शिंदेसेनेत स्पर्धा

Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; 'या' राशींच्या लोकांचे प्रेमसंबंध सुधारणार, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘भरत’ सिंहाची प्रकृती चिंताजनक

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT