Rahuri Crime Saam tv
महाराष्ट्र

Rahuri Crime : जबरी चोरी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात; कृषी केंद्रातून लांबविली होती ३४ हजाराची रोकड

Ahmednagar News : कुरबान शेख आणि दिपक वावरे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरोधात यापूर्वी देखील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
राहुरी (अहमदनगर)
: कृषी सेवा केंद्रात खते खरेदी करत असताना शेतकऱ्याच्या खिशातील ३४ हजार रुपये चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना (Rahuri News) राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र त्यांचा एक साथीदार फरार असून (Police) पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.(Maharashtra News)

कुरबान शेख आणि दिपक वावरे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरोधात यापूर्वी देखील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. २३ डिसेंबर २०२३ ला राहुरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील जयकिसान कृषी सेवा केंद्रात जालींदर चंद्रभान धुमाळ (रा. मुसळवाडी ता. राहुरी) त्यांचे शेतीसाठी खते खरेदी करत असताना त्यांच्या खिशातील ३४ हजार रुपये रोख रक्कम चोरी केली होती. त्याबाबत त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन (Crime News) गुन्हा दाखल केला होता.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदर गुन्ह्यात संशयित कुरबान इस्माईल शेख (वय २५), दिपक उर्फ खड्डया अशोक वावरे (वय २५) यांनी केला असल्याचे गोपनीय माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळताच त्यांनी तातडीने पथक नेमत श्रीरामपुर येथे रवाना केले. यानंतर ९ फेब्रुवारीला आरोपी कुरबान इस्माईल शेख याला तर ११ फेब्रुवारीला दिपक वावरे यांना ताब्यात घेतळे. यातील कुरबान शेख याचेविरुध्द अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

SCROLL FOR NEXT