Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : मुलीची छेड काढल्याने दोन गटात राडा; गावात तणावपूर्ण शांतता

मुलीच्या छेडखानीवरून दोन गटात राडा; गावात तणावपूर्ण शांतता

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहुरी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दोन गटात मारहाणीची घटना घडली आहे. राहुरी (Rahuri News) तालुक्यातील उंबरे गावात मुलीची छेडछाड केल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले असून गावाला (Police) पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. (Live Marathi News)

राहुरी तालुक्यातील उंबरे गावात बुधवारी (२६ जुलै) रात्री दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यानंतर दोन गट समोरासमोर आले. या प्रकरणानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. तर या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. 

१५ संशयितांना घेतले ताब्यात 

या घटनेनंतर राहुरी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत रात्री गावात कोंबिंग ऑपरेशन राबविले. यात १५ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT