Anganwadi Worker Strike Saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Worker Strike: अंगणवाडी सेविकांचा १५ डिसेंबरला नागपूरला एल्गार; राहुरी तहसीलवर मोर्चा काढत सरकारला इशारा

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहुरी (अहमदनगर) : अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या ४ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन अद्यापही सुरूच आहे. दरम्यान आज (Rahuri News) राहुरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Worker) कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. १५ डिसेंबरला राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा मोर्चा नागपूर येथे धडकणार आहे. (Live Marathi News)

मानधन नको वेतन द्या, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या आठ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे अंगणवाडीतील बालकांना मिळणाऱ्या पोषण आहारावर परिणाम झाला आहे. या आंदोलनादरम्यान आज राहुरी तहसील कार्यालयावर शेकडो (Ahmednagar) अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणबाजी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारला दिला इशारा 

अधिवेशन सुरू असतानाही सरकार अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका घेत नसल्याने १५ डिसेंबरला राज्यभरातील अंगणवाडी सेविका नागपूर येथे निदर्शने करणार आहेत. त्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास मत्र्यांना विरोध करण्यासह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT