VIkhe Patil  Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Political News : विखे-पाटलांचा साखर कारखाना निवडणुकीत पराभव, उधारी ठेवत नाही म्हणत विरोधकांना दिलं होतं चॅलेंज

Rashmi Puranik

Ahmednagar News : गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. राहता मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुक थोरात आणि कोल्हे पॅनलने मिळवला आहे.

विखे पाटलांच्या ताब्यात असलेली सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या कोल्हे गटाने आघाडी केली होती. यामुळे विखे प्रणित जनसेवा मंडळ पॅनलला मोठा धक्का बसला आहे.

एकूण 19 जागापैकी 8 जागा जिंकत थोरात आणि कोल्हे पॅनलने ही विजय मिळवला आहे. ऊस उत्पादक गट राहतामध्ये थोरात गटाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहे.  (Latest Marathi News)

सांगता सभेत सुजय विखे भावूक

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत भाजपचे खासदार सुजय विखे भावूक झाले होते. कारखाना चालवताना कुटुंबाची होणारी ओढाताण आणि मुलगी विचारात असलेल्या प्रश्नाबाबत बोलताना खासदार सुजय विखे यांना अश्रू अनावर झाले.

मात्र निवडणूक निकालानंतर विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतील. कारण विखे पाटील कुणाची उधारी ठेवत नाहीत. आम्ही व्याजासह परत करतो असा इशारा सुजय विखे यांनी विरोधकांना दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT