Video Saam Digital
महाराष्ट्र

Ahmednagar News : श्रीरामपूरमध्ये महिलांचा रुद्रावतार; देशी, हातभट्टी दारूची दुकाने पेटवली

Ahmednagar News Update : अहमदनगर जिल्ह्यातील उक्कलगाव येथे गावठी दारूमुळे गेल्या 8 महिन्यात 7 जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी दारूची दुकानं पेटवली आहेत.

Sandeep Gawade

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

देशी आणि हातभट्टी दारू विक्रीविरोधात आक्रमक झालेल्या महिलांनी दारूची दुकानं पेटवली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील उक्कलगाव येथे ही घटना घडली आहे. उक्कलगाव येथे गावठी दारूमुळे गेल्या 8 महिन्यात 7 जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे संतप्त महिलांचा आज रुद्रावतार पहायला मिळाला.

उक्कलगावात गावठी दारूमुळे गेल्या 8 महिन्यात 7 जणांचे बळी गेले आहेत. काल सोमवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याने गावातील महिला संतप्त झाल्या होत्या. महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट गावातील गावठी दारू विक्रीच्या दुकानांवर हल्ला चढवला. यावेळी संतप्त महिलांनी बाटली आडवी करत दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. दरम्यान गावात कायमस्वरुपी दारूबंदी करा अशी मागणी महिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT