Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: मुलगी झाली हो! फटाक्‍यांची आतिषबाजी, पायघड्या टाकत कन्‍यारत्‍नाचे जल्‍लोषात स्वागत

मुलगी झाली हो! फटाक्‍यांची आतिषबाजी, पायघड्या टाकत कन्‍यारत्‍नाचे जल्‍लोषात स्वागत

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील यादव कुटुंबियानी आपल्या घरात जन्माला (Ahmednagar) आलेल्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत केले. फटाक्याची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून धुमधडाक्यात कन्यारत्नाचे स्वागत करण्यात (Sangamner) आल्याने ग्रामस्थ आणि नातेवाईकही भारावून गेले होते. (Latest Marathi News)

मुलगा हा वंशाचा दिवा. मग मुलगी नको मुलगाच हवा म्‍हणून अनेकदा अनधिकृत गर्भपात करून मुलीचा जन्‍म होण्यापुर्वीच तिला मारले जाते. गर्भनिदान करणे गुन्‍हा असून देखील अशा प्रकार गर्भनिदान करून असे अनधिकृत प्रकार अनेक ठिकाणी समोर आले आहेत. परंतु, मुलगा-मुलगी असा भेद न करता समाजात एक चांगला संदेश देण्याचे काम अहमदनगर जिल्‍ह्यातील यादव कुटुंबीयांनी केले आहे.

संगमनेर तालुक्‍यात आश्वी खुर्द येथील जयंत यादव आणि कोमल यादव या दाम्पत्याला नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले. यादव कुटुंबाने स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करताना फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर, रांगोळ्याच्या पायघड्या, फुग्यांची सजावट आणि मिठाईचे वाटप करुन थाटात हे स्वागत केले. यावेळी आश्वी खुर्द ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT