Tomato News Saam TV
महाराष्ट्र

Tomato News: गाईंना टोमॅटोची मेजवानी; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल

Tomato Price Down: भाव मिळत नसल्याने संताप व्यक्त करत या शेतकऱ्याने अशा प्रकारे निषेध व्यक्त केलाय.

Ruchika Jadhav

Ahmednagar News:

टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील तरूण शेतकरी सागर धांगट याने आपल्या शेतातून काढलेले टोमॅटो थेट गाईंना चारा म्हणून खाऊ घातले आहेत. भाव मिळत नसल्याने संताप व्यक्त करत एका शेतकऱ्याने अशा प्रकारे निषेध व्यक्त केलाय. (Latest Ahmednagar News)

काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या दरानी मोठा उच्चांक गाठला होता. मात्र आता उलट परीस्थीती झाली आहे. टोमॅटोला अगदी पन्नास पैसे ते दोन रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील सागर धांगट या होतकरू तरूण शेतकऱ्याने आपल्या शेतातील टोमॅटोची गाईंना मेजवानी दिलीय.

उत्पादनाचा खर्च देखील मिळत नसल्याने सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेती पिकांना चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी हवालदील झालेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून पिके घेतली आहेत. अशात साधा वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी व्याकुळ झाला आहे.

शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करतायत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी टोमॅटोला भाव मिळत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. शेतातून टोमॅटो काढून थेट रस्त्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT