Ahmednagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime: शंकर बाबा सावली मठात चोरी; दानपेटी घेऊन चोरटा पसार

Ahmednagar News : अहमदनगर शहरात असलेल्या माळीवाडा परिसरातील शंकर बाबा सावली मठात चोरी झाली. हा प्रकार सकाळी मंदिराचा पुजारी आल्यावर लक्षात आली.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहमदनगर : अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या शंकर बाबा सावली मठात चोरीची (Ahmednagar) घटना घडली आहे. हा सर्व प्रकार मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. घटना मंदिर पुजारांनी (Crime News) कोतवाली पोलीस स्टेशनला माहिती दिली होती. (Maharashtra News)

अहमदनगर शहरात असलेल्या माळीवाडा परिसरातील शंकर बाबा सावली मठात चोरी झाली. हा प्रकार सकाळी मंदिराचा पुजारी आल्यावर लक्षात आली. (Police) पोलिसांनी आणि मंदिर पुजारी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती अंगावर घोंगडी घेऊन मंदिरात प्रवेश करताना दिसून आला. त्याने सहजरित्या मंदिरात असलेली दानपेटी उचलून नेऊन पोबारा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस श्वान पथक तसेच ठसे तज्ञांनी मंदिरात भेट देऊन तपासणी केली. मात्र काही अंतर गेल्यावर श्वान पथक जागेवर थांबले. त्यामुळे चोरटे गाडीत बसून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध दानपेटी चोरून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update : पगारातून PF कापलं जातं, पण अकाउंटमध्ये पैसे जात नाही? सर्वात आधी ही एक गोष्ट करा!

बिल्डर घराचं पझेशन देण्यास टाळाटाळ करतोय? RERAचा नियम जाणून घ्या; व्याजासह मिळणार संपूर्ण पैसा परत

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Celebrity Ganpati: सुबोध भावे ते सोनाली कुलकर्णी; मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात स्वागत

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

SCROLL FOR NEXT