Sujay Vikhe Patil Balasaheb thorat  Saam tv
महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil : बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येऊ शकतात; सुजय विखे पाटील यांचे सूचक वक्तव्य

Ahmednagar News : भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थोरात हे भाजपमध्ये येतील येतील असे सूचक वक्तव्य केलं

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : बाळासाहेब थोरात भाजपात येतात असं माझ्या कानावर आला आहे. त्याचं कारण म्हणजे महिनाभरात (Ahmednagar) जेवढे कार्यक्रम झाले, त्यामध्ये एकाही कार्यक्रमात ना सोनिया गांधी यांचा फोटो आहे ना राहुल गांधींचा फोटो आहे. वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब का झाले? याला दोनच कारण असू शकतात. एक तर व्यक्ती दुसरीकडे जातोय किंवा त्यांचे फोटो टाकून ते पडतील अशी त्यांची भीती असेल; असा टोला देखील सुजय विखे पाटील (Sujay vikhe Patil) यांनी लगावला. (Maharashtra News)

लोणावळा येथे पार पडलेल्या (Congress) काँग्रेस कमिटीच्या मेळाव्या दरम्यान बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली होती. त्यावर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थोरात हे भाजपमध्ये येतील येतील असे सूचक वक्तव्य केलं आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यांनी शेतीच केली नाही, त्यांनी कांद्याबद्दल बोलू नये
खरिपाचा कांदा हा साठवणूक केला जाऊ शकत नाही. रब्बीचा किंवा उन्हाळ्याचा कांद्याला साठावणूक क्षमता असते. त्यामुळे होर्डिंग होऊ शकत नाहीत, परंतु जे कधी शेतकरी राहिलेच नाही. सहकारी कारखाने घेऊन खाजगी कारखाने बांधले, जमिनी लाटल्या त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा माहिती नाही. आगोदर त्यांनी ज्ञान बदलाव आणि मग आरोप प्रत्यरोप करावे; अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी (Rohit Pawar) रोहित पवारांवर दिली आहे.

रोहित पवार वारंवार घर फोडलं; अशी प्रतिक्रिया देत असून त्यावर प्रश्न विचारले असता सुजय विखे यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं, की त्यांनी सगळ्यांचे घर फोडले. माझ्या सख्ख्या काकांना देखील कोणाच्या स्टेजवर कोण घेऊन गेले. त्याचबरोबर बीड असेल, असे किती घरे त्यांनी फोडले आहेत. आज त्यांचं घर फुटलं म्हणून ते बोलत असल्याचे वक्तव्य सुजय विखे पाटलांनी रोहित पवार यांच्याबद्दल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाला सुरुवात, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारंबळ

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Electricity Bill Mumbai: विज बील होणार स्वस्त, ग्राहकांसाठी नवे दर काय असतील?

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT