Gautami Patil News saam tv
महाराष्ट्र

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील गोंधळ काही थांबेना; हुल्लडबाजांना लाठीचा प्रसाद

Gautami Patil Ahmednagar Dance Program: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्र ठरलेलेच आहे.

Shivani Tichkule

सुशील थोरात

Lavani Dancer Gautami Patil Show: गौतमी पाटील (Gautami Patil) या नावाची वेगळी ओळख करुन द्यायची काही गरज नाही. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सध्या गौतमीचीचं हवा पाहायला मिळते. आपल्या दिलखेचक अदांनी आणि तडफदार लावणीने गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांना तौबा गर्दी पाहायला मिळते. (Breaking Marathi News)

गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्र ठरलेलेच आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम मध्येच बंद करण्याची वेळही येते. तिच्या नृत्यापेक्षा सध्या या राड्याचीच चर्चा अधिक असते. अहमदनगर येथे गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुन्हा राडा झाला आहे. गौतमीच्या हुल्लडबाज चाहत्यांनी कार्यक्रमात राडा घातला. (Latest Marathi News)

पारनेर तालुक्यातील सुपा येथे एका हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि खाजगी सुरक्षा रक्षकांनी या हुल्लडबाजांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पण तरीही हुल्लडबाज ऐकायला तयार नव्हते. अखेर पोलीस (Police) आणि खासगी सुरक्षा रक्षकांनी या हुल्लडबाजांना चांगलाच लाठीचा प्रसाद दिला. त्यानंतर ते बाजूला झाले.

तर यावेळी गौतमीने तिच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलाच सुनवलं. मी महाराष्ट्राची संस्कृती जपते, इतरही काही जण आहे, तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसते का असा सवाल देखील गौतमीने यावेळी उपस्तिथ केला. माझ्या कार्यक्रमाला येऊन बघा काय बिहार होतोय ते मला सांगा असे देखील गौतमी यावेळी म्हणाली.

नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा

दरम्यान, नाशिकमध्ये (Nashik) मंगळवारी १६ मे रोजी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशातच हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात राडा घालण्यास सुरूवात केली होती. यावेळी काही पत्रकार आणि पोलीस या तरुणांची समजूत काढण्यासाठी गेले. तेव्हा या तरुणांनी थेट पत्रकारांना मारहाण केली. या मारहाणीत पत्रकार जखमी झाले असून त्यांना मुका मार देखील लागला. यानंतर पोलिसांनी ६ हुल्लडबाजांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : तिशीतच केस पांढरे होत आहेत, काळेभोर केस या करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा

Maharashtra News Live Update: बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? नाश्त्याला बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत 'शेवग्याच्या शेंगाचा डोसा'

Kobi Matar Bhaji Recipe : कोबीच्या भाजीला द्या मसालेदार ट्विस्ट, बनवा ढाबा स्टाइल कोबी मटर मसाला

Mumbai : मुंबईतील रॅलीपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची जोरदार चर्चा; भाजपला डिवचलं

SCROLL FOR NEXT