Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: दसरा-दिवाळीच्या तोंडावर १५०० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ; रेल्वेकडून जागा खाली करण्याची नोटीस

Ahmednagar News : जागा खाली करण्याबाबत रेल्वे विभागाकडून नोटिस; पंधराशेहून अधिक घरे व व्यावसायिकांचा समावेश

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहमदनगर) : अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरातील बेलापूर रेल्वे स्थानकाच्या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरण केले जाणार आहे. याकरिता (Shrirampur) श्रीरामपूर शहरातील तब्बल दीड हजाराहून अधिक घरे आणि व्यावसायिकांना जागा खाली करण्याच्या रेल्वे (Railway) विभागाने नोटिस बजावल्या आहेत. १०० वर्षापासून वास्तव्य असताना आणि स्वतःच्या नावे उतारे असताना रेल्वे विभागाने बजवालेल्या नोटिसा बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. (Tajya Batmya)

श्रीरामपूर शहरातील बेलापूर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील ५ किलोमीटर अंतराचे विस्तारीकरण करण्यासाठी आजूबाजूच्या भागात असलेल्या १५०० हून अधिक घरे आणि व्यावसायिकांना नोटिस बजावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पीपीई ऍक्ट १९७१ नुसार या नोटिसा बजावण्यात आल्या असून यापूर्वी एकही नोटीस न देता थेट कलम ५ नुसार घरे आणि दुकाने खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. 

या परिसरात १०० वर्षांपासून वास्तव्य असणारे नागरिक राहतात. अनेकांच्या नावे स्वतःचे उतारे सुद्धा आहेत. तर शहराचा डीपी प्लॅन सुद्धा मंजूर असून झालेली बांधकामे नियमानुसार पालिकेची परवानगी घेऊन करण्यात आली आहेत. असे असताना अचानक आलेल्या नोटिसमुळे स्थानिकांना केंद्र आणि राज्य शासन न्याय देणार का ? असा सवाल नागरिकांनी केला. तर भविष्यात या विषयाला धरून जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला.

गेल्या महिन्याच्या अखेरीला या नोटिस प्राप्त झाल्यानंतर आता नागरिकांची धावपळ सुरू झाली. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना याबाबत निवेदन देण्यात आले असून केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची विनंती केली. माझ्याकडे नागरिक आले असून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि मि एकत्र येऊन बैठक घेऊ आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन भाजपचे खासदार सुजय विखे यांनी दिले आहे. तर भाजप श्रीरामपूर नागरिकांच्या पाठीशी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिक भाजप नेत्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

'शिवाजी कोण होता?'चं बनावट पुस्तक? पानसरेंच्या पुस्तकाचं परवानगीविना प्रकाशन?

SCROLL FOR NEXT