Ahmednagar Rashin Father Daughter Death Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: मुलीच्या निधनाची बातमी कळताच बापानेही सोडला जीव; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Ahmednagar Father Daughter Death: एकुलत्या एक विवाहित लेकीच्या मृत्यूची खबर ऐकताक्षणीच बापानेही इहलोकीचा निरोप घेतला.

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar Father Daughter Death: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एकुलत्या एक विवाहित लेकीच्या मृत्यूची खबर ऐकताक्षणीच बापानेही इहलोकीचा निरोप घेतला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी (९ जून) घडली. बाप आणि लेकीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

मीनाक्षी सोमनाथ पवार (वय ३४, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) आणि भागवत विष्णू दंडे (वय ६५, रा. देशमुखवाडी, ता. कर्जत) अशी मृत बाप-लेकींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, अंगणवाडी सेविका असलेल्या मीनाक्षी पवार या काही दिवसांपासून आजारी होत्या.

त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचारस सुरू होते. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याची खबर त्यांचे वडील भागवत दंडे यांना समजताच क्षणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

बाप-लेकीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने राशीनसह (Ahmednagar) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मीनाक्षी यांच्या मागे पती, दोन मुले आणि सासू-सासरे, तर दंडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून आणि नातवंडे, असा परिवार आहे. दंडे हे पैलवान असल्याने राशीनमध्ये वस्ताद नावाने सुपरिचित होते. मीनाक्षीवर डोर्लेवाडी येथे, तर दंडे यांच्यावर देशमुखवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT