Ahmednagar Marriage News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Marriage News : लग्न झालेलं असताना दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढला, पत्नीने पतीला अशी अद्दल घडवली की आयुष्यभर लक्षात राहील

Crime News : लग्नाची घटका जवळ येत असतानाच वधू-वर गळ्यात हाल घालण्याच्या तयारीत असतानाच पहिल्या बायकोने एन्ट्री केल्याने लग्नात एकच गोंधळ उडाला.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News :

पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला आहे. लग्नाची घटका जवळ येत असतानाच वधू-वर गळ्यात हाल घालण्याच्या तयारीत असतानाच पहिल्या बायकोने एन्ट्री केल्याने लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे बेकायदेशीर लग्न रोखून पतीची वरात थेट पोलीस ठाण्यात गेली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय महिलेला पती दुसरं लग्न करत असल्याची माहिती तिला मिळाली. संतापलेल्या पत्नीने आपल्या आई-वडिलांसह आणि बारा वर्षीय मुलासह नगर गाठले. मंगल कार्यालयाचा पत्ता शोधून ती लग्नाच्या काही मिनिटे आधी तेथे पोहोचली. त्यापुढे या लग्नात मोठा राडा झाला. पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या नियोजित वधूला देखील मारहाण केली.

अचानक झालेल्या या प्रकाराने नवीन वधू आणि महिलेचा पती चांगलेच गोंधळून गेले. वऱ्हाडी मंडळींना सुद्धा नेमकं काय सुरु आहेत हेच कळेना. तिथूनच कुणीतरी पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळाने पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि सर्व वरात पोलीस स्टेशनला नेण्यात आली.

पोलीस स्टेशनला आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला. कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता आणि एक मुलगा असताना सुद्धा आपल्या पतीने दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करून एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. मात्र आम्ही त्या ठिकाणी वेळेत पोहोचल्याने तो लग्न सोहळा थांबवण्यात आला. मात्र पतीने फसवणूक करुन दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला असल्याबद्दलचा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विशालविरुद्ध भादंवी 494 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विशाल पवार हा जालना जिल्ह्यात राहणारा असून तसेच त्याची होणारी नववधू ही सुद्धा जालना जिल्ह्यात राहणारी आहे. मात्र दोघांच्या कुटुंबियांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्न न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पत्नीपासून लग्न लपवण्यासाठीच हे लग्न अहमदनगरमध्ये करण्याचा प्लान दोन्ही कुटुंबियांचा होता. मात्र पहिल्या पत्नीने तेथे येऊन त्यांचा हा डाव उधळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT