Pankaja Munde Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde News : आता संघर्ष वाट्याला येणार नाही; असे काम आणि निर्णय घ्यायचाय; पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य

Kopargaon News : आता संघर्ष वाट्याला येणार नाही; असे काम आणि निर्णय घ्यायचाय; पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

कोपरगाव (अहमदनगर) :  भाजप आणि युतीला २५ आमदार निवडून देण्यासाठी माझे योगदान आहे.  मी जो उमेदवार (BJP) सांगते त्याला तुम्ही मतदान करता. मागच्या विधानसभेला तिसरा उमेदवार असता तर परळीत माझा पराभव अशक्य होता. लोकांना वाटते आता ताईच काय ? संघर्ष कन्या नाव बदलायच (Kopragaon) ठरवलं. सगळ्यांना वाटतंय मला आता संघर्षच करायचाय. पण आता संघर्ष वाट्याला येणार नाही असे काम आणि निर्णय करायचा आहे. तुम्ही फक्त विश्वास आणि संयम ठेवा; असे सूचक वक्तव्य (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी समर्थकांसमोर भाषण केले. यावेळी त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. लोकांची इच्छा होती म्हणून शिवपरिक्रमा यात्रा केली. निवडणुका असल्यावर सगळीकडे जाता येत नाही; म्हणून श्रावण महिन्यात ही (Ahmednagar) परिक्रमा केली असून या परिक्रमेला यात्रेच स्वरूप आलं. याच्यापुढे सगळं फिकं, कशाची अपेक्षा नाही; असेही त्या म्हणाल्या.  

राजकीय अस्थिरता आलीय 
राजकारणात काट्यावर चालणाऱ्यांची कदर होते. गालिच्यावर चालणाऱ्यांची कदर होत नाही. हा संघर्ष रुबाबदार आणि स्वाभिमानी बनवतो. तुम्ही मला शक्ती द्याल. कोणतीही वेळ असो माझ्यावरच जनतेचे प्रेम कमी होऊ नये, हे देवाकडे मागितलं. बापाच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं आणि मी राजकारणात आले. तेव्हापासून आजही घराच्या बाहेर आहे. मी मंत्री असताना भ्रष्टाचार मुक्त कारभार केला तरी आरोप झाले. मी कोणासमोर झुकले नाही. आज कोण कुठे जाईल याचा नेम नाही. राजकीय अस्थिरता आली त्यामुळे सुट्टी घेतली.

शुक्राचार्यांचे आशीर्वाद कुठे लागतात मला माहित नाही. मात्र त्यांच्याकडे मृत संजीवनी होती. देवाच्या राजा म्हणजे इंद्राने हे बरोबर केले नाही असे महादेवाने शुक्राचार्यांना सांगितले. त्यामुळे महादेवाने शुक्राचार्यांना मृत संजीवनी विद्या दिली. जेवढे राक्षस देव मारतील तेवढ्यांना जिवंत करण्याची विद्या शुक्राचार्यांकडे होती. त्यामुळे आपल्याही जीवनाला शुक्राचार्य संजीवनी देतील. देवांचा राजा इंद्राचा दाखला देत पंकजा मुंडेंनी नेमका कुणावर निशाणा साधला याची जोरदार चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT