ATM Saam tv
महाराष्ट्र

जिलेटिनने स्फोट करून एटीएममधील १९ लाखावर डल्ला

जिलेटिनने स्फोट करून एटीएममधील १९ लाखावर डल्ला

गोविंद साळुंके

अहमदनगर : संगमनेर शहरात एटीएम फोडून रक्कम लांबवण्याच सत्र सुरूच आहे. संगमनेर शहरालगत असलेल्या अमृतवाहिनी कॉलेज समोरील एच.एफ.डी.सी. बँकेचे एटीएम मध्यरात्री जिलेटीनचा स्पोट करून अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून १९ लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. यापूर्वी अशाच प्रकारे संगमनेर (Sangamner) येथे स्पोट करून एटीएम फोडून लाखो रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. अगदी तशाच प्रकारे पुन्हा जिलेटीनने स्फोट करून एटीएम फोडल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. (ahmednagar news Gelatin explodes at Rs 19 lakh in ATMs)

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील आशा प्रकारे एटीएमचा स्फोट करून लाखो रुपये चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. त्याच घटनेचा तपास लागत नाही; तोच पुन्हा जिलेटिनचा स्फोट करून एटीएम फोडून १९ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. संगमनेर शहरासह तालुक्यात स्पोट करून एटीएम फोडण्याच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. तरीही पोलीस (Police) या घटनेचा गांभीर्याने तपास करत नसल्याचं दिसत आहे.

शंभर फुटावर उडाले मशीन

स्फोट इतका भयानक होता, की एटीएम मशीन अक्षरशः शंभर फुटावर जाऊन पडलेले होते. घटनास्थळी पोलीस दाखल होत वेगवेगळी पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेत आहे. पोलिसांना घटनास्थळी स्पोट घडून आणण्यासाठी वापरलेले साहित्यही मिळून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT