Sandan Vally Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : सांदण दरी येथे चार महिने पर्यटकांना प्रवेश बंदी; वन विभागाने घेतला निर्णय

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे आशिया खंडातील सर्वात खोल अशी सांदन दरी आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
अहमदनगर
: पर्यटनासाठी अनेकजण जात असतात. प्रामुख्याने पावसाळा सुरु झाल्यानंतर भंडारदरा धरण पातळीत क्षेत्रात फिरस्ती करणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र पुढील चार महिने भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सांदण दरी येथे पर्यटकांसाठी बंदी करण्यात आली आहे.

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे आशिया खंडातील सर्वात खोल अशी सांदन दरी आहे. प्रत्येक वर्षी देशभरातील हजारो पर्यटक सांदन दरीला भेट देत असतात. मात्र पावसाळ्यात या दरीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी वन विभागाने चार महिने सांदन दरी येथे प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

खुले करण्याबाबतचा निर्णय नंतरच 

दरम्यान पावसाळा सुरु झाल्यानंतर जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी पर्यटनासाठी वन विभागाने बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सांदन दरी पर्यटनासाठी कधी खुली करायची याबाबत नंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT