Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: तीन महिला चोरांना नागरिकांनी दिले पोलिसात; एसटी बसमध्ये करायच्या चोरी

तीन महिला चोरांना नागरिकांनी दिले पोलिसात; एसटी बसमध्ये करायच्या चोरी

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एसटी बसमध्ये प्रवास करताना महिलांचे (Ahmednagar) दागिने आणि पर्स लांबवणाऱ्या तीन महिला चोरांना नागरीकांनी पोलीसांच्या (Police) ताब्यात दिले आहे. संघटितपणे या चोर महिला जिल्ह्यातील अनेक बसमधून प्रवास करतात आणि हातचलाखीने प्रवासी महिलांना लुटत होत्या. (Tajya Batmya)

संगिता धनवट हि महिला बसमधून प्रवास करत असताना लोणी गावानजीक तिच्या पर्समधून ७५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेले. बसमधील काही महिला चोरी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरीक आणि प्रवासी महिलांनी त्यांना कोल्हार येथील बसस्थानकावर पकडून ठेवले होते. 

काही महिला फरार 

श्रीरामपूर शहरातील सुनिता पाथरकर, संगिता लोंढे आणि काजल गायकवाड या तीन महिलांना लोणी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सोबत असलेल्या इतर महिला चोर मात्र फरार झाल्या असून पोलीस त्यांचाही शोध घेताहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT