Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : ओबीसी आरक्षण बचावासाठी रास्ता रोको; टायर जाळत रोखला महामार्ग

Ahmednagar News : बीड, नगर सीमावरती भागात भगवान गडाच्या पायथ्याशी कीर्तनेवाडी जवळ ओबीसी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहमदनगर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने काढलेला अध्यादेश हा ओबीसींवर (OBC) अन्यायकारक असल्याचे म्हणत ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. यामुळे आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरलेल्या (Ahmednagar) आंदोलकांनी आज रस्त्यावर टायर जाळत आंदोलन केले. (Maharashtra News)

राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarkshan) सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासन अध्यादेश काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजात भितीचे वातावरण आहे. हा निर्णय मुळ ओबीसींवर अन्याय करणारा असल्याचे ओबीसींचे म्हणणे आहे. यामुळे ओबीसी आरक्षण बचावसाठी लढा उभारण्यात आला आहे. यासाठी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अधिकारी न आल्याने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महामार्ग रोखला 

बीड, नगर सीमावरती भागात भगवान गडाच्या पायथ्याशी कीर्तनेवाडी जवळ ओबीसी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. किर्तन वाडी गावातील नागरिकांसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सकाळपासूनच रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनस्थळी कुणीही सरकारी अधिकारी आला नाही त्यामुळे आंदोलन करते संतप्त झाले असून कल्याण- विशाखापट्टणम महामार्गावर ओबीसी आरक्षण बचावासाठी टायर जाळून आंदोलन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT