Ahmednagar Civil Hospital Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी होणार चौकशी; त्रिस्तरीय समितीची नेमणूक

Ahmednagar News : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून चार जणांनी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता दिव्यांग प्रमाणापत्र मिळवल्याबाबत सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार केली होती

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याचे प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असून या चौकशीसाठी त्रिस्तरीय समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. या समितीकडून वरिष्ठांकडे अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. 

अहमदनगरच्या (Ahmednagar) जिल्हा रुग्णालयातून चार जणांनी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता दिव्यांग प्रमाणापत्र मिळवल्याबाबत सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार केली होती. संबंधित चार जणांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्याच्या कोणत्याही नोंदी आढळत नसताना स्वावलंबी कार्ड या शासनाच्या वेबसाईटवर या चार जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र आले कसे असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता. यात जिल्हा रुग्णालयातील काही अधिकारी - डॉक्टरांचा सहभाग असल्याचा आरोप महापुरे यांनी केला आहे. शिवाय त्यांनी याच्या चौकशीसाठी उपोषण देखील सुरु केले होते. 

दरम्यान आता या प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली. त्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा प्रशासकीय अधिकारी साहेबराव डावरे आणि कनिष्ठ लिपिक दत्तात्रय धाडगे या दोघांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, जिल्हा रुग्णालयाकडून करावाई सुरू करण्यात आली असून आठ दिवसांत चौकशी समिती अहवाल देऊन गुन्हा दाखल करण्याची पुढील करावाई करणार असल्याने महापुरे यांनी आपले आंदोलन आठ दिवसांसाठी स्थगित केले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.घोगरे यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT